शेणगाव आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या…!
या होऊ घातलेल्या 13 जून च्या आमरण उपोषनाला प्रशासनाच्या विनंतीवरून तूर्तास स्थगिती ; माजी उपसभापती महेश देवकते यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
जिवती/प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेणगाव येथील आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पदभरती मध्ये स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भारतीय जनता युवा मोर्चा महामंत्री महेश देवकते यांच्या नेतृत्वाखाली दि 13 जून 2022 रोज सोमवारपासून जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना लेखी निवेदनातुन केली होती. परंतु या निवेदनाची दखल घेउन मागितलेल्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन आमरण उपोषणाला वेळ देण्यासाठी प्रशासनाने विनंती केली या विनंतीला मान देउन महेश भाऊ देवकते यांनी रोजगार बचाव समिती समोर हा शासनाचा प्रस्ताव मांडला यावर समितीने अटी पूर्तता करण्याच्या मागणी वरून वेळ देण्याचे सर्वानुमते ठरवले या मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या 10 दिवसापासून पासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वार समोर साखळी उपोषण व आक्रोश मोर्चा करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
शेणगाव येथील काही शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची जागा शासकीय इमारत बांधकामकरणे साठी उपलब्ध करून दिली आहे व इमारत बांधकाम करणे साठी जी व्यक्ती सतत तीन वर्षे त्यांचे योगदान दिले, जागा दिली त्यांना व किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पात्रतेनुसार कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त करणे आवश्यक होते, परंतु त्यांनाही या पदभरती प्रक्रियेमध्ये डावळल्याचे आरोप महेश देवकते केला आहे. याशिवाय जागतिक कोरोना संकट काळात महामारीमध्ये जिवती तालुक्यातील युवक व युवतीनी आपली जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीत यांना सेवा दिलेल्या अनेक बेरोजगार पाञताधारक युवक-युवतींना सुद्धा या पदभरतीत डावळण्यात आले आहे.
CSC केंद्रामार्फत ही कंत्राटी पदभरती करण्यात आली, मात्र या तालुक्यात कोणतीही जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध न करता जाहिरात गोपनिय ठेऊन, परस्पर बाहेरील व्यक्तीला या भरती प्रक्रीयेमध्ये सामील करून घेण्यात आले आहे.
जाहिरात प्रसिद्धीची माहिती अतीदुर्गम जिवती तालुक्यातील बेरोजगार शैक्षणिक पाञताधारक रयुवक-युवतींना न मिळाल्यामुळे येथील सर्व युवक-युवक, विधवा महिला, निराधार महिला यांना रोजगार पासून वंचित रहावे लागत असल्याचे आरोप महेश देवकते यांनी केला आहे. या अन्यायाचे वाचा फोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री, खासदार, राजुरा विधानसभेचे आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकलेखा समिती चे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना पुन्हा निवेदनाद्वारे दिली आहे.