भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने सपत्निक सत्कार

0
692

भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने सपत्निक सत्कार

 

 

भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा सेवा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. यानिमित्ताने एका छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याद्वारे महाराष्ट्रीयन पद्धतीने मोऱ्हार्ड यांचा सपत्निक सत्कार केला. या सोहळ्याला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध देशांतील वाणिज्यदूत, उद्योजक तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

जर्गन मोऱ्हार्ड २०१६ पासून भारतात सेवेत होते. मुंबई कार्यालयात सेवा बजावत असताना त्यांचे राज्य शासन आणि उद्योग विभाग कार्यालयासोबत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. इंडो-जर्मन संकल्पना पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

 

जर्मनीतील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या कंपन्यांच्या मोठा वाटा आहे. दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यामध्ये वाणिज्यदुतांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी जर्मनीतील कंपन्यांसह महावाणिज्यदूत मोऱ्हार्ड यांनी वेळोवेळ सहकार्य केले. त्यांची मैत्री कायम स्मरणात राहील.

 

महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा यावेळी हिमरू शाल देऊन सत्कार केला तर त्यांच्या पत्नी पेट्रो यांना श्रीमती सुषमा सुभाष देसाई यांच्या हस्ते भारतीय परंपरेची ओळख सांगणारी पैठणी साडी दिली.

 

यावेळी कृष्णा मोहन (बीएएसएफ), विस्टन पेरेरा, मोहित रैना, अनुपम चतुर्वेदी, डीएचएलचे संचालक सुब्रमण्यम्, सिमेन्सचे सुनील माथूर, मायकल ब्राऊन (ऑस्ट्रेलियाचे सह वाणिज्यदूत), साऊथ कोरियाचे यांग ओग किम, सिंगापूरचे चेंग मिंग फुंग आदी उपस्थित होते. तसेच उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here