इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय विरुर (स्टे.) चा उत्कृष्ट निकाल

0
939

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय विरुर (स्टे.) चा उत्कृष्ट निकाल

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस .सी. (12,वी) परीक्षेचा निकाल आज दिनांक 08/06/2022 ला ऑनलाइन घोषित करण्यात आला. त्यामध्ये राजुरा तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्ये शैक्षणिक कार्य करणाऱ्या इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय विरुर (स्टे) या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 98.86,टक्के, एवढा लागला असून विज्ञान शाखेस एकूण 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 62, विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 24 विद्यार्थी प्रथम श्रेणी, आणि द्वितीय श्रेणी 01,विद्यार्थी उत्तीर्ण झाले .यामध्ये फारीश शेख 88.17 टक्के, विवेक जाभोर 86.83 टक्के ,कुमारी शिवानी साळवे 85.33 टक्के, कु ,गायत्री मिलमिले 84.67 टक्के, व मृणाली पायपरे 84.33 टक्के, उर्वरित 57,विध्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच कला शाखेमध्ये 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्राविण्य श्रेणी 01 विद्यार्थी प्रथम श्रेणी 24 विद्यार्थी व द्वितीयत श्रेणी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे.

महाविद्यालयामध्ये उपलब्ध भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्न व मेहनत शिक्षकांचे व पालकांचे योग्य मार्गदर्शन, आणि प्राचार्यांचे शिस्तबध्द व कुशल नियंत्रण यामुळेच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. अशी प्रतिक्रिया संस्थापक- सचिव प्राचार्य पायपरे सर यांनी व्यक्त केली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील उच्च शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here