अखेर त्या आई वडिलांना पाच लाखाचा धनादेश वितरित
चंद्रपूर-मुल मार्गावरील भिषण अपघात
9 जण होरपळून मृत्यू झाल्याची घटना
कोठारी :- राज जुनघरे
रवींद्र आत्राम या भूमिहीन मजुरांची आर्थिक परिस्तिथी कमकुवत असल्याने व नियमित अडचणी चा सामना करीत असल्याने तोहोगाव येथील रवींद्र आत्राम परिवाराचा मुलगा संदीप वय 22 वर्ष हा आपल्या कुटूंबियांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या मामा विलास मडावी यांचे कडे रोजगार शोदा साठी बल्लारपूर तालुक्यातील दहेली इथं राहायला गेला होता.रोजगार तर प्राप्त झाला पण तोच रोजगार त्याच काळ बनला,अखेर रोजगारा पायी संदीप ला आपला जीव गमवावा लागल्याने तोहोगाव मध्य सर्वत्र शोकानकुल वातावरण पसरले होते.
चंद्रपूर – मूल चंद्रपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक.19 मे ला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.वडसा वरून चंद्रपूर ला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक Mh 31 cq 2770 व चंद्रपूर वरून मूल कडे जाणारा डीझल टँकर क्रमांक Mh 40 BG 4060 या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली, आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने पूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले 9 जण जळून खाक झाले होते त्यामद्ये तोहोगाव येथील संदीप आत्राम याचा समावेश होता.आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार सुभाष धोटे यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे मृतकाच्या परिवाराला पाच लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून देण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री नि परिस्थितीचा गांभीर्य ओडखून मृतकाच्या परिवारांना पाच लक्ष रुपये देण्याची घोषणा केली होती.
गोंडपीपरी चे तहसीलदार के डी मेश्राम तोहोगाव येथील मृतक संदीप आत्राम च्या घरी भेट देऊन वडील रवींद्र आत्राम व आई सविता आत्राम यांचे कडे पाच लक्ष रुपयाचे धनादेश दिले.धनादेशातून प्राप्त होणाऱ्या राशी चा उपयोग चांगल्या कामासाठी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.या वेडेस गोंडपीपरी चे तहसीलदार श्री के डी मेश्राम, श्री विनोद नागपूर,अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती गोंडपीपरी, फिरोज पठाण,सदस्य संजय गांधी निराधार समिती गोंडपीपरी, संतोष बंडावर अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस गोंडपीपरी,सौ अमावस्या ताडे सरपंच तोहोगाव,शुभांगी मोरे,उपसरपंच तोहोगाव,सुवर्ण खारडे तलाठी तोहोगाव,प्रवीण मोरे व रामदास वाघडे ,मिलिंद वानखेडे यांचे उपस्तीत मृतक संदीप आत्राम यांचे वडील रवींद्र आत्राम व आई सविता आत्राम उपस्तीत होते.