वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबतचा भेदभाव चव्हाट्यावर
सविस्तर वृत्त असे की, शासन नियम प्रमाणे शासन सेवेमध्ये रुजू असलेल्या डॉक्टरांना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी दवाखाने चालवण्याची परवानगी नाही. असे असताना देखील संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वच कंत्राटी स्वरूपी व स्थाई स्वरूपी वैद्यकीय अधिकारी हे आपले खाजगी दवाखाने चालवीत आहेत. मग कायदा हा सर्वांसाठी समान असताना देखील अशा प्रकारे कायदा मोडणाऱ्या सर्वांवरचं कार्यवाही न करता चंद्रपुरातील काही अधिकारी जाणीवपूर्वक हेतूपुरस्पर व राजकारण करून काही ठराविक वैद्यकीय अधिकाऱ्यांना टारगेट करून त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांचे दवाखाने बंद करण्याकरिता त्यांना सांगितलेले आहे. व त्यांना असे देखील सांगितले आहे की आपली तक्रार आली म्हणून आपले दवाखाने बंद करा!!! ही बाब युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या लक्षात येताच आज दिनांक:- ०२/०६/२०२२ रोजी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातील जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक अधिकारी यांना सदर प्रकरणा संबंधात निवेदन देत, कुठल्या एकाच व्यक्तीला टार्गेट करून कार्यवाही न करिता सर्वांवरच सारखी कार्यवाही करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन दिले. व अधिकारी जर कोणाची तक्रार आल्यानंतरच जागे होत असतील तर आता युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूर तर्फे निवेदन देत मागणी करण्यात आली की “जर कार्यवाही करायचीच असेल तर! चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी दवाखाने सुरू आहेत. मग त्या सर्वांवरच कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केली.