दिल्ली टीम कडून मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचा कामाची पाहणी
कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथे भेट
आवाळपूर :- मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था असून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्केल प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्य विकासाचे काम अविरतपणे सुरु आहे. याच कामाची पाहणी करण्या करिता जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु. या गावामध्ये मॅजिक बस हेड ऑफिस, दिल्ली येथून सिनियर मॅनेजर अर्चिता मोईत्रा आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांनी भेट दिली.
पाहुण्यांचे आगमन झाल्यावर शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका, गावातील उपसरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या मराठी संस्कृती नुसार पाहुण्यांचे पाय धुवून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.. पाहुण्यांनी मॅजिक बसचे ट्रेन टीचर धुर्वे मॅडम यांच्याशी चर्चा केली व त्यांचे मॅजिक बस आणि कामाबाबत मत जाणून घेतले सोबतच विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला, विद्यार्थी, पालक आणि गावातील स्टेक होल्डर यांनी मॅजिक बस च्या कमाबाबत आपले मत मांडून गावात होत असलेल्या कामाचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी या वर्षात मॅजिक बस सत्रातून आपण काय काय शिकलो याचे महिनेवार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड्स दिले.
या महिन्यातील ए टी. पी वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट पाहुण्यांना दाखवले. पीयर लीड सेशन झाले आणि गावातील स्टडी पॉइंट आणि स्टडी कॉर्नर बघण्यात आले. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी शाळा सहाय्यक अधिकारी मुकेश भोयर व अंतरगाव येथील समुदाय समन्वयक अस्मिता वाघमारे यांच्या सोबतच मॅजिक बस स्टाफ निखिलेश चौधरी, भूषण शेंडे, शंकर पुरडकर, प्रतीक्षा सहारे व गावातील पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.