ग्रामीण उद्योजगांची मुंबईत राज्य स्तरीय परिषद….
भारताला खाद्य तेल पुरवठ्यात स्वावलंबी करणार….काशिराम वंजारी
अहमदनगर
संगमनेर २/६/२०२२(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
देशात खाद्यतेले यांचा मोठा प्रमाणात तुटवडा भासत असून, भारता सारख्या बलशाली देशाला अद्याप ही खाद्य तेल आयात करावे लागते , हे आयात खाद्यतेल सुमार दर्जाचे असते व जनतेच्या आरोग्याला हानिकारक ही असते म्हणून भारताला खाद्य तेल बाबत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अँड अग्रिकल्चर ने केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक काशिराम वंजारी यांनी व्यक्त केला.
ग्रामीण महाराष्ट्रातील नवं तेल खाद्य उत्पादकांची राज्य स्तरीय परिषद नुकतीच मुंबईत हॉटेल लेमनट्री या पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडली. या परिषदेला ग्रामीण भागातील संपूर्ण राज्यातील दोनशे प्रतिनिधी व नवं उद्योजग सामील झाले होते.
कृषी क्षेत्रातील ,प्रख्यात “अकोले पॅटर्न ” ची स्थापना करण्यात आली असून ,लवकरच याचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री व राज्याचे कृषिमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वयंपूर्ण शेतकरी व शेतकरी उद्योजग कसा बनवणार याचा हा ,”अकोले पॅटर्न” असून शेतकरी सभासद यांना दरमहा हमखास रक्कम या पॅटर्न अंतर्गत दिली जाणार आहे.
देशात खाद्य तेल किती निकृष्ट दर्जाचे असते, तसेच ते आरोग्याला हानिकारक ही असते याचा शास्त्रीय आधार घेऊन , डॉक्टर मंडळीने आता खाद्य तेल बाबत जन जागृती केली पाहिजे,असे ही ते म्हणाले.लाकडी तेल घाना उद्योग ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संजीवनी असून , देशातील जनतेचे आरोग्य सुधार प्रकल्प ही चेंबर ने हाथी घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा उद्योग सध्या सुमारे दोनशे करोड ची उलाढाल करत असून , एक हजार कोटींचे उद्दिष्ठ चेंबरने ठेवले असून ,या करिता चेंबरची उप कंपनी आर एस के नॅचरल ही कंपनी बाजारात मार्केटिंग करत आहे.
तेलबिया संशोधन व पुरवठा बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी हमी दिली असून, विदर्भातील सुमारे २५०० हेक्टर वर भुईमूग लागवड केली जाणार असून, मराठवाड्यात करडई ,सूर्यफूल लागवडी बाबत चर्चा सुरू झाली आहे. ३१ मार्च २०२३ अखेर राज्यात लाकडी तेल घाना प्रकल्पाचे २हजार उद्योग उभे राहणार आहेत .राज्यातील ३५८ तालुक्यात ही क्रांती घडून आणली जाणार असून, बँका ही या प्रकल्पास मंजुरी देत आहेत.
हा प्रकल्प उत्तर भारत, राजस्थान ,केरळ या राज्यात ही राबवला जाणार असून ,देशातील खाद्य तेलाची आयात कमी करून आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रयत्न चेंबर मार्फत केला जाणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वच उद्योजग शेतकरी व त्यांची मुले असून ते प्रथमच पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चेंबरद्वारा ग्रामीण भागातच नव्हे तर कल्याण , डोंबवली शहर भागात ही लाकडी तेल घाना उद्योग उभे केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सर्व उद्योजग यांना काही लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद धुळे चे अध्यक्ष श्री डॉ. तुषार रंधे यांचे ही मार्गदर्शन झाले. या परिषदेस चेंबरचे उप अध्यक्ष नारायणसिंग साबळे, वित्तीय सल्लागार तुषार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुजित सिंग, मुख्य अर्थ व्यवस्थापक शर्मा, भूषण पाटील, मुजाहिद शेख , विनायक खांडेकर , श्रीमती गीता मोरे, आदी हजर होते. इरफान कौशाली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार व्यवस्थापकीय अधिकारी गुरुजीत सिंग यांनी मानले.