नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांच्यापुढे जिल्ह्यात दारू बंदीच्या कठोर अंमलबजावणीचे आव्हान
चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. अरविंद साळवे, भापोसे यांनी दिनांक 19-09-2020 रोजी मध्यान्हांनंतर आपले पदाचा कार्यभार स्विकारला.
पोलीस अधीक्षक आहेत मेकॅनिकल इंजिनियर :
मुळचे वैदर्भीय असलेले अरविंद साळवे यांचे बालपण आणि शिक्षण वडीलांच्या नोकरीमुळे औरंगाबाद शहरात झाले. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरमधून पदवी घेतली आहे.
त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यांची सर्वप्रथम नियुक्ती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली.त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, देसाईगंज आणि भंडारा येथे 1999 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केले.
2008 साली अमरावतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम सांभाळल्यानंतर अमरावतीतच लाल लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक झाले. त्यानंतर नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. भंडारा येथे येण्यापूर्वी ते मुंबई येथे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक होते. राज्यातील वीज चोरी थांबविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली.
आजपर्यंत च्या सर्व नियुक्त्यांवर गांभीर्याने काम कारणाने अधिकारी म्हणून ओळख आलेले साळवे आता चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाढत्या गुन्हेगारी ला ते कसा लगाम लावतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.