बाबूपेठ उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाबूपेठ वासियांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे बाबूपेठ येथील नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आभार मानले आहे.
बाबुपेठ येथिल रेल्वे रुळावर उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. मात्र निधी अभावी सदर पुलाच्या बांधकामाची गती मंदावली होती. त्यामुळे या पुल बांधकामाच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. या संदर्भात त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सविस्तर चर्चा करून नागरिकांची होत असलेली अडचण लक्षात आणून दिली होती. त्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांनी सदर पुलाच्या कामासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. सदर निधी मंजूर होताच बाबूपेठ वासियांमध्ये उत्साह आहे.
दरम्यान येथील नागरिकांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत आ. जोरगेवार यांचे आभार मानले आहे. यावेळी याच वर्षी सदर उड्डाणपुलावरून वाहतूक सूरू होईल या दिशेने माझे प्रयत्न सुरू असून मनपाने यासाठी त्यांच्याकडे असलेले 5 कोटी रुपये तात्काळ वळते करावे असे निर्देश दिले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ वासियांना सांगितले आहे. या प्रसंगी बाबूपेठ येथील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.