रमाई यांची पुण्यतिथी संपन्न
चंद्रपूर (प्रति)-आज दिनांक 27 मे 2022 रोज शुक्रवार ला लूबिनीवन बुध्दविहार, लूंबिनीनगर बायपास रोड बाबपूठ चंद्रपूर कार्यक्रमाल प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मा. ज्योती सहारे मॅडम, मार्गदर्शक म्हणून बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका मा. सुजाता लाटकर व कार्यक्रमाचे अध्यक्षा संगीता उमरे उपस्थित होत्या. माननिय ज्योती सहारे मॅडम यांनी माता रमाआई यांच्या जिवनातील कष्टमय जीवनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या उध्दारासाठी कुटूंबाची पर्वा न करता स्वतःहा त्यागमय जिवन जगुन विश्वनिर्माता भारतीय घटनाकार भारताला बहाल केले. अशा रमाईच्या जिवनातील अनेक प्रसंग सांगून आदर्श रमाईला अभिवादन केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या मा. बौध्द महासभा केंद्रीय शिक्षिका मा सुजाता लाटकर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करतांना म्हणाले रमाई बाबासाहेबांचे नाते कसे होते. आणि रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेबाच्या त्याग समाजाच्या प्रति कसा होता यावर प्रकाश टाकला व सुंदर रमाईचे, गीत सादर करुन रमाईच्या स्मृतीदिनानिमित्त्य अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगिता उमरे यांनी अध्यक्षीयभाषणात म्हणाल्या की, जे जे महामानव झाले आईवीना पोरखे राहूनच क्रांती केली. तथागत भगवान बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीकारी बदल समाजात घडविला अश्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन मा. तेजराज भगत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता मा. विलास फुलझेले, विनोद वाळके, विजया भगत, शालीनी दुर्योधन, कातकर ताई, प्रेमीला गायकवाड, आशा कांबळे, रेखा वाळके, कुसूम गोटे, कुरखेडेताई आभार प्रदर्शन पल्लवी गणवीर यांनी केले.