बापुपेठ उड्डाणपुलाचे थकीत असलेले पाच कोटी रुपये मनपाने तात्काळ द्यावे

0
764

बापुपेठ उड्डाणपुलाचे थकीत असलेले पाच कोटी रुपये मनपाने तात्काळ द्यावे

यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन

 

 

 

बाबुपेठ उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई होत असल्याने पुलाचे काम संत गतीने सुरु आहे. मात्र आता सदर कामाची गती वाढावी या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले असुन नुकतेच नगरविकास मंत्री यांनी 5 कोटी 26 लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. तर मनपाकडे थकीत असलेले 5 कोटी रुपयेही मनपाने तात्काळ अदा करावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 

आज यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेत सदर मागणीचे निवेदन त्यांना दिले आहे. लवकरच मनपा प्रशासन या उड्डाणपुलाचे 5 कोटी रुपये अदा करेल असे आश्वासन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी दिले आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, मुन्ना जोगी, चंद्रशेखर देशमुख, विलास सोमलवार, शहर संघटक रुपेश पांडे, बबलु मेश्राम, बादल हजारे, प्रतिक हजारे आदिंची उपस्थिती होती.

 

 

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी उर्वरित 5 कोटी 26 लक्ष रुपयांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतु उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता प्रशासकीय मान्यतानुसार चंद्रपूर महानगरपालिका तर्फे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे शासनातर्फे निर्देशित करण्यात आले होते. परंतु अजूनही महानगरपालिका तर्फे हा निधी देण्यात आलेला नाही. हा निधी प्राप्त न झाल्यामुळे मागील अनेक वर्षापासून बाबूपेठ उड्डाणपुलाचे बांधकाम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे रहदारी रस्ता उपलब्ध नसल्याने आणि बांधकाम बंद असल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना रहदारी करतांना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर मनपा द्वारे सुरु असलेले सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचे काम त्वरित थांबवून सदर निधी बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी वर्ग करण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असुन एक महिण्याच्या आत हा निधी न दिल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा ईशारा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here