पदवीधर नोंदणीची मुदत वाढवून देण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलन ची मागणी
काल दिनांक २५/०५/२०२२ ला गोंडवाना विद्यापीठ सिनेट पदवीधर नोंदणी साठी मुदत वाढवून देण्यासाठी कुलगुरू यांना सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, अॅड. जगदिप खोब्रागडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, ओबीसी सेवा संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके आदी उपस्थित होते.