सामाजिक जागृती साठी आशुतोष ची भारत भ्रमंती

0
1121

सामाजिक जागृती साठी आशुतोष ची भारत भ्रमंती

 

● 1800 किमी चा पायदळ प्रवास
● कोठारीत जंगी स्वागत

कोठारी : राज जुनघरे
सामाजिक बांधिलकी जपत एक २५ वर्षीय तरुण विविध जन सामान्यांच्या समस्या घेऊन भारत पादाक्रांत करण्यासाठी निघालेला आहे. विदेशात शिक्षण घेऊन भारतात परतला आणि तळागळातील समस्यांचा उद्रेक पाहून हवालदिल झालेल्या या कोकणातील चिपळूण येथील तरुणाने मजल दर मजल पायदळ प्रवास करीत कोठारी गाव गाठले असता नागरिकांनी जंगी स्वागत केले.

आशुतोष जोशी, चिपळूण (कोकण)

आशुतोष जोशी असे या तरुणाचे नाव असून तो कोकणातील चिपळूण येथील रहिवासी आहे. त्याने इंग्लड येथे आपले शिक्षण पूर्ण केले. व कोरोना काळात तो मायभुमीत दाखल झाला. आजचा शिक्षित युवक व यूवा पिढी शिक्षण घेऊन नौकरी, व्यवसायात रममान होण्याचे स्वप्न पाहतो. आपली नौकरी आणि आपला परिवार या चौकटीत गुरफटला जातो. मात्र आशुतोष हा धैयवेळा तरुण जनसामान्यांच्या विविध समस्या घेऊन भारत पादाक्रांत करण्यासाठी निघालेला आहे.

 

भारतातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न, आदिवासींच्या समस्या, कोरोणा काळात विदेशातील व भारतातील परिस्थिती, धर्म- जाती- वर्ण भेदाच्या जोखळात अडकलेला भारत अशा अनेक समस्या घेऊन सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी गावोगावी तो पायदळी वाटा, मार्ग, रस्ते तुळवित आशुतोष भ्रमंती करतो आहे. 1800 किं.मी. चा प्रवास करीत तो कोठारी गावात दाखल झाला असता. कोठारी वाशीयांनी या तरूण प्रवाशांचे जंगी स्वागत केले. यावेळी सरपंच मोरेश्वर लोहे, ग्रा. पं. सदस्य अमोल कातकर, युवराज तोडे, स्नेहल टिंबडिया, पत्रकार सुरेश रंगारी, राज जुनघरे, वंचित चे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, वंचीत चे शाखा अध्यक्ष अनिल विरुटकर, नितिन रायपुरे, पराग टिंबडिया, सुरेश चहारे, व नागरक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here