पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत – आ. किशोर जोरगेवार
जेष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांनी आपल्या लेखणीच्या धारेवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. अनेक सामाजिक विषयांवर ते लेखणीच्या माध्यमातुन व्यक्त होत असे. पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी पत्रकारीतेत काम केले. महाराष्ट्रातील अनेक नामांकित मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांमधून आपले लेखनकौशल्य दाखविले. त्यांच्या निधनाची बातमी दु:खद असुन त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंदेशातुन व्यक्त केली आहे.
अगदी बाल पणापासुन सुरेशजी धोपटे यांची पत्रकारिता आम्ही पाहली आहे. त्यांनी पत्रकारितेची नैतिक मूल्य जोपासत पत्रकारिता जगात वेगळा ठसा उमटविला होता. त्याकाळी काही ठराविक पत्रकार होते. त्यात सुरेशजी धोपटे हे एक नाव नेहमी चर्चेत राहायचे. राजकिय आणि सामजिक विषयांवर ते लेखनीच्या माध्यमातून भाष्य करत असत. त्यांच्या या विषयांचीही दखल घेतली जात. एकादा विषय सुटेपर्यंत त्याचा पाठपूरावा करण्याची त्यांची जिद्द असायची. अनेक पत्रकार आणि राजकिय नेत्यांचेही ते मार्गदर्शक होते. आज त्यांच्या जाण्याने पत्रकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दु:खातुन सावरण्याचे बळ परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावे ही प्रार्थना करतो अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.