सिमेंट कंपनी चे प्रदूषण व गडचांदूर तालुका निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांना निवेदन
प्रवीण मेश्राम, कोरपना
गडचांदूर येथे सिमेंट कंपनी मुळे होणारे वायू व जल प्रदूषण वर आळा घालावा, या सह गडचांदूर तालुका संघर्ष समिती चे वतीने मागील अनेक वर्षांपासून गडचांदूर तालुका निर्मिती ची मागणी रेटल्या जात असून शासन स्तरावर हा निर्णय प्रलंबित आहे. राज्य शासनाने गडचांदूर ला तालुक्याचा दर्जा देण्या साठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात गडचांदूर तालुका निर्मिती करावी अशी मागणी गडचांदूर तालुका संघर्ष समिती चे अध्यक्ष उद्धव पुरी यांनी मुख्य संघटक व प्रदूषण नियंत्रण कृती समितीचे सदस्य उद्धव पुरी यांनी राज्याचे मुख्य , मुख्यमंत्री, महसूलमंत्री,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , महसूल विभागाच्या प्रधान सचिव मंत्रालय मुंबई गाठून व प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.
या सोबतच नगर परिषद मधील भोंगळ कारभाराची चौकशी करून मुख्याधिकारी यांची त्वरित बदलीची मागणी केली आहे.
गडचांदूर परिसरातील काहीजण अनेकांना ब्लॅक मेलिंग करून रक्कम उकळणे, जागा हडप करण्याचे प्रकार सुद्धा आढळुन येत असल्याने त्यांचा शोध घेऊन व चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही ची मागणी गृह विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे केली आहे।
मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना उचित कार्यवाही चे आदेश दिल्याची माहिती असून यावर काय कार्यवाही होते या कडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.