गजानन नगरी येथील पाणी समस्येबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाची एमआयडीसीच्या अधिका-र्यांशी बैठक
एमआयडीसीच्या माध्यमातुन गजानन नगरी येथे सुरु होणार पाणी पुरवठा
सिदुर ग्रामपंचायत अंतर्गत येणा- र्या गजानन नगरी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर आ. जोरगेवार यांच्या एका शिष्टमंडळाने एमआयडीच्या अधिका-र्यांशी बैठक घेत येथील पाणी प्रश्न निकाली काढला आहे. आता सदर गजानन नगरी येथे एमआयडीसीच्या माध्यमातुन पाणी पुरवठा लवकर सुरु केल्या जाणार आहे. तसा प्रस्ताव एम.आय.डी सी मंत्रालयाकडे पाठवणार आहे. सदर बैठकीला एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता बुंदेले, पाणी पुरवठा विभागाचे तायवाडे, दाताडा सरपंच रविंद्र लोणगाडे, यंग चांदा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, सिदुर ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल इग्रपवार, यंग चांदा ब्रिगेडचे नकुल वासमवार, भाग्यवान गणफुले, गुड्डु सिंह आदिंची उपस्थिती होती.
सिदूर ग्रामपंचायत अंतर्गत गजानन नगरी वास्तव्यास आहे. या ठिकाणी जवळपास १०० च्या वरती घरे असून परिसरात नवीन घरांचे बांधकाम सुद्धा सुरू आहे. गजानन नगरी लगत चंद्रपूर एम. आय. डी. सी. ची पाणी पुरवठा लाईन गेली आहे. त्यामुळे सदर गेलेल्या पाण्याच्या लाईन वरून गजानन नगरी येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नळाचे कनेक्शन दिल्यास येथील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटु शकतो. त्यामुळे येथील नल कनेक्शन एम.आय.डी.सीच्या पाईप लाईन वरून देण्यात याव. अशी मागणी सदर बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने एम.आय.डी.सीच्या अधिका-र्यांना केली. यावेळी सदर मागणीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर गजानन नगरी येथे एम. आय. डि. सीच्या पाईप लाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु करण्याचे संबंधीत अधिका-र्यांनी मान्य केले आहे. तसा प्रस्ताव आता एम.आय.डी.सीच्या वतीने वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे गजानन नगरी येथील पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. या बैठकीला गजानन नगरी येथी नागरिक डॉ. राशेज हिरेमठ, शेखर पारखी, सचिन कांबळे, मारोती पुटकमवार, पुंजाराम कुळसंगे, पांडुरंग पिंपळकर, महादेव जाधव, प्रेमदास बोरकर, जि.एम कादरी, रिया हिरेमठ, ज्योती गायकी, किर्ती कांबळे, रजनी पिंपळकर, मंगला चिरमलवार आदिंची उपस्थिती होती.