निमकर यांच्या हस्ते सहा सुवर्णपदक प्राप्त, रिया लेखराजी यांचा सत्कार
राजुरा : शैक्षणिकदृष्ट्या राजुरा शहराची ओळख दिवसेंदिवस एक पाऊल पुढे चालली असून या शहरातून महाराष्ट्रासह देशाच्या स्तरावर विद्यार्थीनी मजल मारली असून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशीच एक कामगिरी येथील रिया लेखराजानी हिने केली असून पुणे विद्यापिठातून सहा सुवर्णपदक पटकावित राजुरा शहरात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थिनींचा गौरव नुकताच माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्यांच्या घरी जाऊन केला आहे.
राजुरा येथील व्यापारी राहुल ट्रेडर्स चे संचालक सुनिल लेखराजानी यांची कन्या रिया हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ अंतर्गत असलेल्या सिंहगढ बिजनेस स्कुल पुणे येथून २०२० ला एम.बी.ए.(फायनान्स) पूर्ण केले. नुकतेच एम.बी.ए.(फायनान्स) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून सहा सुवर्पदक पटकाविल्याबद्दल पुणे येथे राज्याचे उच्च व तन्त्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मुल्यांकन आणी मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ.भुषण पटवर्धन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सहा सुवर्णपदक देऊन (दि.12 मे) सन्मानित करण्यात आले होते. राजुरा नगरीतील आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी छोटेखानी कार्यक्रम घेत रिया लेखराजनी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील उज्वल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनिल हस्तक, अशोक मेडपल्लीवार, श्रीकांत दिक्षीत, सुरेश लेखराजानी प्रमुख्याने उपस्थीत होते.