गोंडपिपरीत वैशाख बुद्ध पौर्णिमा ठिकठिकाणी साजरी
भंत्ते आर्यसुत्त यांचे मोलाचे मार्गदर्शन
सूरसंगम बुद्ध भीम गितांसह, खीरदानाचे आयोजन
गोंडपिपरी :– गोंडपीपरी येथे विविध ठिकाणी वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त ध्वजारोहण व पंचशील बुद्ध विहार,दीपस्तंभ बुद्ध विहार येथे खीर दानाचा कार्यक्रम घेण्यात आला. विसाव्या शतकात केवळ बुद्धाचा धम्म तारू शकतो. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करून दुःखाचे निवारण कसे करता येईल यावर प्रबोधन करण्यात आले. बौद्ध उपासक व उपासिकेने बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. सायं ६.३० वाजता पंचशील बुद्ध विहारात प्रबोधन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष भंत्ते आर्यसुत्त थेरो यांनी मानवतेला तारणारा बुद्ध धम्म जगाला वाचवू शकतो असे सांगत मानवाच्या जगण्यातील सत्य ओळखून जीवन जगावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. राकेश बांबोळे, गमतीदास फुलझेले यांनी बुद्धाच्या विचारांवर मार्गदर्शन केले, हनमंतू झाडे,भारत झाडे,राजेश लभाने,विशाखा फुलझेले, कल्याणी दुर्गे या अतिथिंच्या उपस्थितीत प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृती समिती अध्यक्षांच्या हस्ते जनता विद्यालय समोर पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.
“सुरसंगंम” संगीतमय प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. संचालन शैलेश झाडे, गायिका ज्योती रामटेके, रुपेश निमसरकार, प्रवीण भसारकर यांनी वातावरण संगीतमय केले. उद्धव नारनवरे, राजू झाडे,मोरेश्वर दुर्गे, झेड जे उराडे, तोषविनाथ झाडे, सचिन झाडे, तसेच समस्त कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बौद्ध उपासकांनी अथक परिश्रम घेतले.