कौटुंबिक हिंसाचार सहन करणे चुकीचे – ऍड. राहुल वासनिक
मॅजिकच्या साहस कार्यक्रमात मार्गदर्शन
तालुका प्रतिनिधी
चिमूर
विवाहानंतर कौटुंबिक हिंसाचार गुमान सहन करून हाल अपेष्ठा भोगणे चुकीचे असून या पासून संरक्षण मिळण्यासाठी महिला संरक्षण कायदा आहे.त्या अंतर्गत महिलावर होणाऱ्या कौटूंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्याद्वारे प्राप्त होते असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात कार्यरत असणारे ऍड.राहुल वासनिक यांनी केले. ते ब्राईटेज फाउंडेशनच्या मॅजिक उपक्रमाअंतर्गत मुलीकरिता आयोजित साहस या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी महिला संरक्षण व कौटुंबिक हिंसाचारापासून बचाव,हुंडा प्रतिबंध,बाल लेंगिक संरक्षण,स्त्री विरोधी प्रथा-परंपरा आणि त्यातून मुक्तता या सर्वं विषयावर विस्तृत अशी माहिती दिली.अशी समस्या कुणाच्या आयुष्यात उद्भवली तर कायद्याद्वारे न्याय कसा मिळवायचा व दाद कुठे करायची या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.ब्राईटेज फाउंडेशन द्वारे मॅजिक उपक्रमाअंतर्गत चिमूर तालुक्यातील भिशी येथे साहस-तूच कर तुझे रक्षण हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात शेकडो विद्यार्थिनींना विविध बाबाचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.