वैशाख बुद्ध पौर्णिमा राजुरा शहरात ठिकठिकाणी साजरी
राजुरा : राजुरा येथे विविध ठिकाणी वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त ध्वजारोहण व सम्यक बुद्ध विहार येथे खीर दानाचा कार्यक्रम घेण्यात आला. बुद्धांचे विचार आत्मसात करून दुःखाचे निवारण कसे करता येईल यावर प्रबोधन करण्यात आले. बौद्ध उपासक व उपासिकेने बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा शेवट केला. आज संध्याकाळी ६.३० वाजता प्रभातफेरी संविधान चौकातून काढण्यात येणार असून चुनाभट्टी वॉर्ड येथे भोजन दानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

संविधान चौक येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण युवा कार्यकर्ता तथा पत्रकार अमोल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमताच शहरातील युवा कार्यकर्त्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला. यामुळे समाजातील युवकांना स्फूर्ती व प्रेरणा नक्कीच मिळेल असा आशावाद राऊत यांनी व्यक्त केला. बौद्ध समाजातील युवकांनी पुढे येऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर कार्य केल्यास समाजाच्या प्रवाहाला वेग व दिशा मिळेल. असा सूर उपस्थित उपासकांत दिसून आला.

“नगरपरिषद प्रशासनाकडून संविधान चौक येथे आदल्या दिवशी कोणतीच साफसफाई करण्यात आली नाही. नगरपरिषद प्रशासनाला बुद्ध पौर्णिमेचा विसर पडला असल्याचे दिसून आले. नगरपरिषद प्रशासक यांचेशी संपर्क केला असता त्यांनी साफसफाई करण्याचे व स्वच्छता ठेवण्यासाठी लक्ष देण्यात येईल असे सांगितले.”

आरपीआय गवई गटाचे तालुका अध्यक्ष शामसुंदर मेश्राम, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, भीमराव दुर्गे, योगेश करमनकर, वसंता मुन, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, सुरेंद्र फुसाटे, धनराज उमरे, किरणकुमार वनकर, चवरे साहेब, माजी नगरसेविका गिताताई पथाडे, वर्षा दुर्गे, माया लोखंडे, सुरेश मेश्राम, गौतम चौरे, गौतम देवगडे, भिमराव खोबरागड़े, दुर्गे सर आदी उपासक व उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहरातील बौद्ध उपासकांनी अथक परिश%8