सावरकर नगर येथील झोपडपट्टया हटवु नये यंग चांदा ब्रिगेडची मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना मागणी
सावरकर नगर येथील नागरिकांना रेल्वे विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून येथे राहत असलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सावरकर नगर ही विस्तापीत आणि मंजूर वस्ती आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने सदर वस्ती हटवु नये अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना देण्यात आले आहे.
मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी हे चंद्रपूर दौ-र्यावर आहे. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत सदर मागणीसह ईतर महत्वाच्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अधिवक्ता आघाडीचे शहराध्यक्ष अॅड. परमानंद यादव, कुणबी समाज महिला शहराध्यक्षा आशा देशमुख, चंद्रशेखर देशमुख, बादल हजारे, सतनाम सिंग मिरजा आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील दुर्गम भाग असूनही औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, कोळसा, लोहखनिज, सिमेंट उद्योग, आणि चुनखडीच्या मोठ्या खाणी येथे आहेत, ताडोबा टायगर नॅशनलपार्क सारखी जगप्रसिध्द प्रेक्षणीय स्थळेही येथे आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर रेल्वे सर्कलकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सदर निवेदना म्हटले असून बल्हारशाह – मुंबई सीएसएमटी सेवाग्राम संमिश्र एक्सप्रेस सध्या चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबलेली आहे. याचा परिणाम गडचिरोली, चंद्रपूर आणि मुंबई सारख्या नक्षलग्रस्त भागांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेवर झाला आहे. मुंबई, नाशिकसारख्या भागात जाण्यासाठी या भागातील नागरिकांना १७१ किमीचा प्रवास करून नागपूरहून रेल्वे पकडावी लागते. परिणामी लहान मुले, महिला व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बल्हारशाह.- मुंबई सीएसएमटी सेवाग्राम कंपोझिट एक्स्प्रेस ट्रेन त्वरित सुरू करण्यात यावी, , चंद्रपूर स्थानकाखालील तडाळी रेल्वे साईडिंगची बिकट अवस्था आहे. येथे माल उतरवताना प्रदूषण होत आहे. त्यामुळे तडाळी रेल्वे स्थानकाची दुरुस्ती करून अद्ययावत सेवा देण्यात यावी, काझीपेठ – चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पुणे साप्ताहिक एसएफ एक्स्प्रेस आठवड्यातून किमान 3 दिवस चालवली जावी, घुग्गुस स्टेशन मालधक्का शहराच्या बाहेरील भागात स्थलांतरित करण्यात यावा, तिसऱ्या ओळीचे काम वेगाने करण्यात यावे, चंद्रपूर सिडी, चांदाफोर्ट सिएएफ शी जोडण्यात यावे, चंद्रपूरच्या जवळील भागातील प्रवाश्यांना कोलकात्याला सहज पोहचता यावे या करिता एनडी एस आर सी सुपर एक्सप्रेस आणि व्हाईस व्हर्सा ट्रेन चांदाफोर्ट – नागभीड मार्गे चालविण्यात यावी चंद्रपुरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता येथील स्थानकांवर जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मार्गासाठी चंद्रपूर – वर्धा ते नागपूर रोजची पॅसेंजर ट्रेन सुरू कण्यात यावी आदि मागण्या सदर निवेदनाच्या माध्यमातुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्या आहे.