छत्रपती संभाजीराजे यांची पत्रपरिषद
छत्रपती संभाजीराजे यांची आज हॉटेल रामी ग्रँड, आपटे रोड, पुणे येथे पत्रकार परिषद होती. त्यावेळी त्यांनी आज त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीबाबत स्पष्टीकरण दिले.
छत्रपती संभाजीराजे यांनी जनहितार्थ काम करून सर्व बहुजनांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तसेच विखुरलेल्या सर्व बहुजन वर्गास संघटित करण्यासाठी “स्वराज्य” या नावाने संघटना आजपासून चालू करत आहोत असेही घोषणा केली.
छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांना पुढील छावा स्वराज्य सेनेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.
सदर भेटीप्रसंगी प्रदेश महिला अध्यक्षा शीतलताई हुलावळे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख निर्मला रायरीकर, पुणे शहर युवा महिला अध्यक्षा मंगल कांबळे, छत्रपती शिवाजी नगर युवक अध्यक्ष हेमंत शिगवण, छावा स्वराज्य सेना प्रसिध्दी प्रमुख तेजस सुर्वे, सुमित जांभुळकर आदी उपस्थित होते.