अबब…! चेक पोस्ट नायगाव पासून उकनी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
चेक पोस्ट नायगाव पासून उकनी रस्त्यावर संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरीकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चेक पोस्ट नायगाव पासून ते उकनी पर्यंत रस्त्यावर टॅंकर ने पाणी मारण्यात येत होते. मात्र गेल्या चार दिवसा पासून या रस्त्यावर पाणी मारण्यात येत नसल्याने ये-जा करणाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
याकडे WCL सब एरिया चे दुर्लक्ष झाले आहे. नागरीकांना धुळी मुळे गाडी चालवण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ये-जा करण्यासाठी एकच रस्ता असल्याने जनतेला संबंधित विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे आरोग्य धोक्यात टाकावे लागत आहे. WCL सब एरिया व्यवस्थापक यांनी तात्काळ घटना स्थळ गाठून प्रत्यक्ष पाहणी करून कडक उन्हाच्या दिवसात नायगाव पासून उकनी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर नित्यनेमाने पाण्याचा फवारा करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.