मनपाच्या डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

0
777

मनपाच्या डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना

 

 

 

मनपाच्या डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून सतत घडणाऱ्या या घटना भविष्यात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे. यावेळी मनपाचे स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल शेडके, मुख्य स्वच्छता निरीक्षक अनिरुध्द राजूरकर, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, राशेद हुसेन, करणसिंह बैस आदिंची उपस्थिती होती.
बायपास मार्गावरील अष्टभुजा जवळ चंद्रपूर महानगर पालिकेचे डम्पिंग यार्ड आहे. शहरातून निघणारा कचरा संकलन करुन येथे साठविण्यात येतो. नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र येथील कच-र्याला आग लागण्याच्या घटना अधून मधून घडत राहत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या आगीमुळे निघणा-या धुराने परिसरात प्रदुषणाचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा सदर डम्पिंग यार्डमध्ये साठविण्यात आलेल्या कच-याला आग लागल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी डम्पिंग यार्ड येथे पोहचत आगीची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथे सतत घडत असणा-या या घटनांच्या कारणांची आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित मनपा अधिका-र्यांकडून माहिती घेतली. या घटना टाळण्यासाठी किंव्हा त्यावर वेळीच अंकुश लावण्यासाठी येथे उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी चिंताही व्यक्त केली. वांरवार येथे लागण्या-या आगीवर तात्काळ अंकुश मिळविण्यासाठी येथे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मपना प्रशासनाला केल्यात. चंद्रपूरात प्रदुषण अधिक आहे. अशात अशा घटनांमुळे प्रदुषणात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे गांर्भियाणे पाहत भविष्यात अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत.

 

चोराळा येथील भंगारच्या गोदामाला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

चोराळा येथील एका भंगारच्या गोदामाल आज अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर ठिकाणी जात आगीची पाहणी केली. या आगीत गोदामामधील साधन सामग्री जळुन खाक झाल्याने गोदाम मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आगीमागचे कारण जाणून घेतले. प्रशासनाने सदर ठिकाणचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here