सामान्य जनतेकडून बेकायदेशीर मासिक फी आकारणे निषेधार्ह

0
823

सामान्य जनतेकडून बेकायदेशीर मासिक फी आकारणे निषेधार्ह
छावा स्वराज्य सेना

 

छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेस त्यांच्या निषेधाचे पत्र देण्यात आले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही त्यांच्या आवारात येणाऱ्या (BMCC मैदान, हनुमान टेकडी, फर्ग्युसन कॉलेज मैदान किंवा त्यांच्या आवारात चालण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांडून मासिक फी प्रत्येकी रुपये २०० आकारणार आहे. म्हणजेच “नागरिकांना आरोग्यासाठी लागणारी शुद्ध हवा घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार का?”

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या निर्णयावर छावा स्वराज्य सेनेच्या वतीने निषेधाचे पत्र हे सोसायटीचे सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी यांना देण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की अशा कोणत्याही प्रकारची लूट सर्व सामान्य नागरिकांची करू नका आणि असा पायंडा पाडू नका. कारण असे मोठ्या जागा असणाऱ्या शैक्षणिक संस्था खूप आहे पुण्यात आणि सगळ्याच अशा प्रकारे मासिक फी आकारू लागल्या तर लोकांचे आरोग्य धोक्यात येईल किंवा त्यांना सकाळी मिळणारी शुद्ध व मोकळी हवा मिळणार नाही आणि पैसे वाचविण्याच्या कारणामुळे लोक रस्त्यावर गर्दी करतील आणि पुढे काहीही वाहतुकीमुळे घडू शकते आणि ही फी सर्व सामान्य नागरिकास न परवडणारी आहे.

सदर निषेधाचे पत्र देताना छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख, प्रदेश महिला अध्यक्षा शीतलताई हुलावळे, छ. शिवाजीनगर युवक अध्यक्ष हेमंत शिगवण, छावा स्वराज्य सेना प्रसिध्दी प्रमुख तेजस सुर्वे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here