आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे ” आयोजन

0
551

 

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे ” आयोजन

कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

आठवडाभर चालणाऱ्या या “सेवा सप्ताहात” समाजोपयोगी विविध उपक्रम केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आज नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्रांमध्ये आज कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते, आमदार प्रसादजी लाड साहेब ह्यांच्या आयोजनाने *”वृक्षारोपण”* करण्यात आले.

तसेच कोरोना चा वाढत्या पार्श्वभूमीवर हे रोखण्यासाठी सुंदर नगर को. ऑप. हौ. सोसायटी, ईमारत क्र.१/२ च्या साईबाबा मंदिरा जवळ सेनापती बापट मार्ग, दादर (प) हिथे *डॉक्टर आपल्या दारी* हे उपक्रम विनामूल्य राबविण्यात आले.

कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालीदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर विभाग तसेच (बी जे एस) ग्रुप यांच्या विद्यमाने विभागातील नागरिकांसाठी पावसाळी आजार (ताप, खोकला, अंगदुखी, थंडी, वाहती सर्दी) या लक्षणांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व ओषधाचे वितरण करण्यात आले.

ह्या सर्व उपक्रमाला मोलाचे योगदान श्री.जितेंद्र विष्णू कांबळे साहेब यांच्यासह विशेष सहकार्य राजेश शिरवाडकर (जिल्हाध्यक्ष) विजय डगरे (अध्यक्ष वडाळा विधासभा), अक्षता तेंडुलकर (अध्यक्षा माहिम विधानसभा) मनोज शहा ( वॉड अध्यक्ष १९२ ) प्रतिक्षा सावे ( महिला वॉड अध्यक्षा १९२), अशोक शर्मा ( जिल्हा उपाध्यक्ष ), जयंत नाट्टे ( जिल्हा उपाध्यक्ष ), एकनाथ संगम, विवेक भाटकर ( जिला सचिव ), संतोष सुकडे( वॉड महामंत्री), जितू गुप्ता, राजन डेरवणकर, प्रमोद सावंत, बाळा हारेर, मनीष तोडणकर, सूर्यकांत गर्द, सूर्यकांत मुळीक, संदीप तिवरेकर, संतोष शिंदे, अमोल मोहिते, दिपक ढवण, आदर्श दुबे, संतोष खेडेकर, राजेश जाधव रिषीकेश शिखरे,प्रितम शिरसाळे, योगेश आहिरे, संतोष बंगेरा, अजय चव्हाण सह, सुंदर नगर को. ऑप. हौ. सोसायटी आणि साईकृपा मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले. रहिवाशांनी ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिले.

समस्या गंभीर.. पण.. आम्ही आहोत खंबीर, जबाबदारी आमची खबरदारी तुमची, सोशल डिशटनस चे पालन करा, कोरोनाला दूर ठेवा..अशा घोषणा देत उपक्रम राबविण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here