आपल्या न्याय व हक्कासाठी कुंसुबीचा आदिवासीचा
संघर्ष सुरू…
चंद्रपूर, 2 मे : काल जिवती तालुक्यातील, अतिदुर्गम भागातील मौजा कुंसुबीचे 24 आदिवासी कुंटुब, ज्यांच्या जमीनी 36 वर्षांपासून मानीकगड सिमेंट कंपनीने कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने हुसकावून लावून 24 आदिवासी कुंटूबाना वंचित केले, बेदखल केले. लोकप्रतिनिधी व महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन सुद्धा 36 वर्षांपासून ऐकत नव्हते, कंपनी पुढे नतमस्तक झाले होते.
तेव्हा त्यांनी आपली व्यथा घेऊन जिवती पासून 150 किमी वरोरा तालुक्यातील वरोरा शहरातील तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या घरी येऊन व्यथा मांडली.
विनोद खोब्रागडे यांनी व्यथा ऐकुन तात्काळ उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील अँड. गजेंद्र बडे नागपूर यांचा कडे नागपूरला घेऊन गेले व केस घटना समजावून सांगितले. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथून न्याय व हक्क मिळवून घेऊ, असे आश्वासन वकील साहेब यांनी दिले.
सर्व आदिवासी बांधवानी समाधान व्यक्त केले. भर उन्हात 500 किमी चा प्रवास करून घरी परतले. अशी माहिती तलाठी विनोद खोब्रागडे यांनी दिली.