आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश
शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी 14 कोटींची कामे मंजूर
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्याला यश आले असून शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात विविध विकासकामांसह सामाजिक सभागृह व सौदर्यीकरणांच्या कामांचा समावेश आहे.
चंद्रपूर मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासाकरिता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही प्राप्त होत असून मोठा निधी त्यांनी खेचून आणला आहे. यातून शहर व ग्रामीण भागांचा विकास केला जात आहे. दरम्यान त्यांच्या पाठपूराव्याला पून्हा एकदा यश आले असून खनिज, अल्पसंख्याक, ग्रामविकास 25/15, आणि जन सुविधा जिल्हा वार्षीक निधी अशा चार निधी अंतर्गत 14 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. या निधीतून चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागाच्या विकासकामांना गती मिळणार आहे. यात जन सुविधा जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत मंजूर झालेल्या 1 कोटी 80 लक्ष रुपयात ग्रामीण भागातील विविध विकास कामे केल्या जाणार आहे. तर 25/15 अंतर्गत प्राप्त झालेल्या 5 कोटी रुपयातून ग्रामीण भागात समाज भवन आणि मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. खनिज विकास निधीतून ४ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून सदर निधीतून शहरी व ग्रामीण भागातील भूमिगत नाल्यांची व रस्त्यांची कामे केल्या जाणार आहे. जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत 2 कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीतून महानगर पालिका हद्दीतील मोकळ्या जागेवर सुरक्षाभिंतीचे काम केल्या जाणार आहे.
अल्पसंख्याक विभागातून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर निधीतून मतदार संघात येणा-र्या शहर भागातील कामे केल्या जाणार आहे. यात पठाणपूरा येथील साउदी बोहरा कब्रस्तान येथे सामाजिक भवनाचे बांधकाम, घुग्घूस नगर परिषद येथील अल्पसंख्याक वस्तींमध्ये सिमेंट काॅंक्रिट रस्त्यांचे बांधकाम, बिनबा गेट शाही दरगाह येथे सौरक्षण भिंतीचे बांधकाम आणि रहेमत नगर येथील सिस्टर काॅलोनी अल्पसंख्याक वस्तीमध्ये सिमेंट काॅंक्रिट रोड आणि नालीच्या बांधकामाचा समावेश आहे. सदर सर्व कामांना लवकरच सुरवात होणार असून या कामांमुळे शहर व ग्रामीण भागाच्या विकासात मोठा भर पडणार आहे.