कोरपना येथे देशी दारू दुकान ना हरकतीचा ठराव पारित
तीव्र निदर्शने ; ठरावाला विरोधी नगरसेवक व महिलांचा विरोध
कोरपना – कोरपना येथे यापूर्वी स्थानिक व्यक्तीचे देशी दारू दुकान होते. १९९३-१९९४ मध्ये दारूमुळे होणारे दुष्परिणाम, कुटुंबातील कलह, महिलांचा होणारा अपमान या सबबीने तात्कालीन ग्रामपंचायतींचे सरपंच विजयराव बावणे यांनी ग्रामसभा व महिला सभा घेऊन सी एल ३ चे देशी दारू विक्रीचे दुकान बंद पाडले. याविरोधात अनुज्ञप्ती धारक यांनी न्यायालयात सुद्धा दाद मागितली. परंतु न्यायालयाने ग्रामसभेत पुढे झालेला ठराव कायम ठेवल्याने अनुज्ञाप्ती धारकाच्या प्रयत्नाला अपयश आले . असे असताना विद्यमान नगराध्यक्ष यांनी २२ एप्रिल २२ रोजी विशेष सभेची नोटीस काढून दिनाक २५ एप्रिल ला सभा घेण्यात आली . या नोटिशित मुख्याधिकारी यांनी विषय क्र १ मध्ये पाणीपुरवठा योजना सल्लागार नियुक्तीसाठी व नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याची टिपणी माहिती दिली. हि धादांत खोटी माहिती असून अशा प्रकारची कुठलीही योजना शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली नाही. सत्ताधारी पक्षाने व्यतीगत स्वार्थ पोटी ज्यांनी 26 वर्ष पूर्वी दारू दुकान बंद केले. त्यांच्याच अर्धांगिनी योगायोगाने विद्यमान नगराध्यक्ष नदांताई बावने असताना मुंबईतील नंदा पोळ यांना सी एल ३ देशी दारू दुकान सुरू करण्याकरिता विषय क्र २ नुसार ठराव आणला. सभागृहात मुख्याधिकारी गैरहजर असताना लीपिकाकरवी ठराव पारित करून ६विरुद्ध १३ मतांनी ठराव पारित केला. याबाबत स्वीकृत नगरसेवक किशोर बावणे यांनी ही सभा बेकायदेशीर आहे. लिपिकाच अधिकार दिल्याचा व सक्षम अधिकारी असताना लिपीक अध्यासी अधिकारी कामकाज पार पाडणे अयोग्य आहे ही सभानियमबाह्य असल्याचा आरोप नोंदवून यापूर्वी शासनाने २००८ , २००९,२०१२ वेळोवेळी शासन निर्णय घेतले आहे. परंतु याचीही पायमल्ली केली आहे. देशी दारू ला नाहरकत देण्यास गावकऱ्यांचा व महिलांचा मोठा विरोध आहे. नगराध्यक्ष यांनी घाईगर्दीत ठराव पारित करून यापूर्वी महिला आंदोलन महिला आंदोलनामुळे झालेल्या ग्रामपचायत ग्रामसभेत दुकान बंद करण्याचा निर्णय कायम असताना २ विषयावर चर्चा घेऊ नये असे मत मांडले. गटनेत्या गीता डोहे यांनी ठराव नामंजूर करण्यात यावा. या निर्णयाचा निषेध व विरोध व्यक्त केला. या निर्णयाच्या विरोधात सभागृहापुढे निर्देशने व घोषणाबाजी करण्यात आली व ठरावाच्या विरोधात आक्षेप अर्ज अनेकानी दाखल करूण निषेध केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सय्यद आबिद अली, शेतकरी संघटनेचे अड. श्रीनिवास मुसळे, भारतीय जनता पार्टीचे अमोल आसेकार, शिवसेनेचे अतुल आसेकर, स्वाभिमान पक्षाचे मोहब्बत खान , माजी नगरसेवक सुहेल अली, अविनाश मुसळे , अभय डोहे, सुनील बावणे, अड पवन मोहितकर, विजय पानघटे, अमोल टोगे, विनोद कुमरे,
नदिर कादरी, नगरसेविका वर्षा लांडगे, सविता तुमराम, आशा झाडे, सुभाष हरबडे, इंदिरा कोल्हे, नंदा डाखरे, साधना डाखरे, हर्षा इटनकार, मिरा मोडक, नीता मुसळे यांचे सह शेकडो नागरिकाच्या उपस्थितीत निषेध नोंदवून ठराव नियमबाह्य असल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.