म्हणजे उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग…
टिळकांनी इंग्रजांना विचारले डोकं ठिकाणावर आहे का? आज महाराष्ट्र ,भाजप ला विचारतोय डोकी ठीक आहेत ना?
ज्ञानेश्वर गायकर पाटील रविवार विशेष
राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार वर बेताल आरोप करणाऱ्या सर्वच भाजप नेत्यांची मोठी गर्दी होत आहे. कोल्हापूर उत्तर चा निकाल आला अन् भाजपची घालमेल चालू झाली. केंद्रीय तपास यंत्रणा यांनी राज्यातील महा विकास आघाडी सरकारला बेजबाबदार वर्तन करून जेरीस आणले .तरी ही मी पुन्हा येत नाही अशी भावना फडवणीस यांची झाली व त्यांनी पुन्हा राज्यात अशांतता कशी निर्माण होईल याचे एक षडयंत्र रचले. राज्यात महा विकास आघाडी सरकार कोरोना काळात तीन वर्ष काम करत आहे. सरकारला आता कुठ वेळ मिळाला.राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे काम राज्य सरकार जोरदार करत आहे. शेतकरी निर्णय असतील की कामगार निर्णय , शिक्षण निर्णय असतील की कायदा सुव्यवस्था सर्वच निर्णय तडाखेबाज होत असताना , मी पुन्हा येत नाही असे वाटल्याने राज्य अशांत कसे करता येईल व आपली पोळी कशी भाजता येईल याचे एकदम चौदा ट्विट करून विकृत मानसिकता राज्याला दाखुन दिली.
सदावर्ते नावाचा एक वकील एसटी कामगार यांना फसवत होता याचे विदारक सत्य बाहेर येत आहे. एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची नस आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा महा विकास आघाडी कशी बदनाम होईल या करिता भाजप नी पडळकर , खोत यांना पुढे आणले.आझाद मैदान त्यांनी अर्धवट सोडून दिले, का सोडून दिले या मागे ही मोठा इतिहास आहे. एसटी कामगार संघटना हळूहळू संपातून माघार घेत होत्या , पुढील आंदोलन एसटी कामगारांची माथी भडकून सदावर्ते यांच्या कडे सोपवण्याची जबाबदारी भाजप ने अत्यंत नियोजपूर्वक केली. पुढे हा सदावर्ते व त्याची भाषा ,सर्व महाराष्ट्राने पाहिली . हे काम पडळकर ,खोत यांच्याकडून घेण्यास भाजप नेते घाबरले व त्यांनी नियोजनपूर्वक सदावर्ते याला दिले.सदावर्ते आज विकृत मानसिकता चे भोग भोगत आहे. अनेक गंभीर बाबी समोर आल्याने तो अनेक जिल्ह्यांची वारी करत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात धिडघुस घालत होत्या. एकटे संजय राऊत त्यांना प्रतिउत्तर देत होते . राज्यातील मंत्री २२ वर्षपूर्वी केलेल्या व्यवहारात नियोजन बद्ध अडकवले गेले.राज्यातील एक अभ्यासू नेता ,मंत्री विनाकारण आत गेला.तीच अवस्था अनिल देशमुख यांची आहे. मुख्य आरोपी तत्कालीन आयुक्त गायब झाला, त्याला संरक्षण कोणी दिले हे न सांगणे बरे. तो अद्याप ही बाहेर आहे. एक विचित्र अवस्था सध्या राज्यात चालू आहे.न्यायालय प्रक्रियेवर संजय राऊत सह अन्य लोकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
देशात महागाई चे मोठे संकट आले आहे.सर्व सामान्य माणसाचे जिने हैराण झाले आहे. बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी हैराण आहे.व्यापारी हैराण आहे.देशाची आर्थिक स्थिती नाजूक आहे.पेट्रोल डिझेल चे अर्थनिती याला कारणीभूत आहे. मोदी सरकार या वर भाष्य करत नाही. यूपी व अन्य राज्याची निवडणूक पार पडली व पेट्रोल डिझेल, गॅस ने सर्व सामन्याचे कंबरडे मोडले. राज्य सरकार सर्वात जास्त उत्पन्न केंद्राला देते.उलट राज्याला सावत्र वागणूक मिळते.
केंद्र सरकार वर लोक नाराज आहेत याचे रूपांतर अन्य मार्गात कसे करावे म्हणून धर्म ही अफूची गोळी पुढे आली. यातून राज्यात राज ठाकरे यांचे वर्तन आपण सध्या पाहत आहोत. हनुमान चालीसा पठण हे काय रस्त्यावर म्हण्यांची पूजा नाही.ती घरात या मंदिरात जाऊन म्हटली पाहिजे .भोंगा वाद निर्माण झाला.मीडियाने तारतम्य न बाळगता त्यात तेल ओतले.राज्यातील जनतेने किमान लहान मुले, विध्यार्थी यांच्या समोर जातीय ,धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे टीव्ही पाहू नये. सकारात्मक बाबी मीडिया दाखवत नाही.मिडीयाला समाज माफ करणार नाही, एखाद्या दिवशी मीडिया ही जनतेच्या मैदानात सापडेल व वाचताना मुश्कील होईल.
राज ठाकरे यांची प्रतेक निवडणुकीला बदलणारी भूमिका हास्य निर्माण करते.मतांचे गणित दूर घेऊन जाते.भाजप बरोबर गेले तर त्यांचे मोठे नुकसान होईल हे ही एका सर्वेत पुढं आले आहे. आगामी मुंबई महानगर पालिका मध्ये शिवसेना ,राष्ट्रवादी एक हाती सत्ता घेईल असा प्राथमिक अंदाज आहे, हे तीन सर्व्ह ने सिद्ध ही केले, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी, कोल्हापूर राष्ट्रवादी, संभाजीनगर शिवसेना , नागपूर काँग्रेस कडे जाण्याची तयारी झाली आहे.हे भाजपला माहिती असल्याने त्यांनी धर्माची गोळी पुढे केली आहे.
भाजपने पोट निवडणुकीत मोठा मार खाल्ला. आगामी गुजराथ निवडणुकीत मध्ये टिकाव धरणे जिकिरीचे झाले आहे. हिमाचल तर नक्कीच जाणार आहे, हरियाणा मध्ये आप सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रपती व उप राष्ट्रपती निवडणुकीत सुमारे ९००० मते भाजपला कमी आहेत. बिहारचे नितीन जी नाराज आहेत, तर दुसरीकडे ओरिसाच्या मातीत ही भाजपला स्थान नाही.या सर्व बाबी विचारात घेतल्या तर भाजपला राष्ट्रपती निवडणूक सोपी नाही. विरोधी पक्षाची मोठी मिठी भाजपला आवळून बसली आहे. २०२४ ला राज्यात महा विकास आघाडी लोकसभेला एकत्र लढली तर ४८ पैकी ४२ खासदार विरोधकच निवडून येतील असा एक ताजा सर्व्हे सांगतो. काल मुंबईत राणा दाम्पत्य यांनी जो ड्रामा केला त्याची घृणा सगळीकडे दिसली. भाजप ची किंमत व मते अजून कमी होताना दिसत आहे. कंबोज व किरीट सोमय्या विनाकारण दंगल उत्पन्न व्हावी म्हणून तिथं गेले. ही भाजप ची निती राज्य अशांत करण्याकरिता होती हे सर्व ज्ञात आहे. यातून भाजपचे मोठे नुकसान होत आहे. काल कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा झाला. सर्वच व्यक्त्यानी संयमी भाषणे केली.जयंत पाटील यांनी एक चिमुरडी उभी करून राष्ट्रवादी किती खोलवर पोहचली हेच नजरेस भरविले. इतका मोठा अलोट गर्दीची सभा घेण्यास राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्यास तयार झाली ,याची पावतीच मिळाली.
शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र दिसले. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांचा बोलबाला विदर्भ वगळता राहणार, तर विदर्भात काँग्रेस ची गाडी पुढे जाईल. राज ठाकरे यांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, तर भाजप पुन्हा एकदा पन्नास आमदाराच्या घरात जाऊन आपले निम्मे आमदार कमी करील.निवडणूक तोंडावर अनेक स्वार्थी लोक पुन्हा एकदा मागे वळतील , व पोरा बाळांची सोय करतील. महा विकास आघाडी मजबूत होत आहे ,मग तो कोळसा न मिळण्याची निती असो की केंद्रीय तपास यंत्रणा दडपण असो , अथवा सदावर्ते , राज ठाकरे , राणा दाम्पत्य असो.. भाजप ची निती चुकत आहे.फडवणीस व भाजप फसत आहे. विरोधी पक्ष कसा असावा याचे आकलन होत नाही. दरेकर राष्ट्रपती राजवटची हास्यस्पद मागणी करतात. वाचाळ वीर भाजप कडे खूप असल्याने भाजप संपत आहे. संपली ही पाहिजे….