बल्लारपुर ब्रेकींग न्यूज
सर्वे नंबर ३१/९३ शेतजमीनीच्या च्या सरकारी दस्तावेजातुन आदिवासी कलम ३६ हटविणार्या बल्लारपुर साझा क्रं १७ चे तलाठी चव्हाण व अरुण गेडाम व यात शामिल इतरांची पोलखोल
बल्लारपुर : साझा सर्वे नंबर ३१/९३ या शेतजमिनीच्या दस्तावेज मधुन बल्लारपुर चे तलाठी चव्हाण यांनी सातबारा वर डमी फेरफार क्रमांक २३७४ ची नोंद घेऊन, अरुण गेडाम यांच्या ३१/९३ या शेतजमिनीच्या दस्तावेज मधुन कलम ३६ हटविलेली आहे. जेव्हा आदिवासी च्या जमिनीच्या कागदपत्राची आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी पाठपुरावा केले असता कागदपत्रात अनेक चुका दिसुन आल्यामुळे तात्काळ मान. जिल्हाधिकारी साहेब मान. तहसिलदार बल्लारपुर, उपविभागीय अधिकारी बल्लारपुर, पोलीस निरीक्षक बल्लारपुर यांचे कडे पुराव्या सहित तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी तहसिलदार बल्लारपुर यांना चौकशी करीता दोन दा पत्र देऊन सुद्धा अजुन पर्यंत कोणती कारवाई करण्यात आली नाही. बल्लारपुर चे अनेक बिल्डर नी तलाठी ला हाताशी धरुन आदिवासी जमिनीमध्ये कलम ३६ हटवुन घोळ केलेला आहे. अनेक लोकांना आदिवासी च्या जमिनीची रजिस्ट्री सुद्धा केली करिता त्याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने प्रिया झांबरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे. सर्वे नंबर ३१/९३ या शेतजमिनीच्या हेराफेरी मध्ये तलाठी, अरुण गेडाम च्या व्यतिरीक्त अनेक मोठ्या बिल्डर चे हात आहेत. २०१४ मध्ये ३१/९३ चा सौदा झाला त्या वेळेस सातबारा वर कलम ३६ ची नोंद होती परंतु २०१९ नंतर सातबारा व इतर दस्तावेज रेकार्ड वरुन कलम ३६ हटविण्यात आल्याचे दिसुन आले यावरु युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी हे ठाम पणे प्रुफ करु शकते की २०१९ नंतर या कामाला नविन मोड देण्यात आलेला आहे. लवकरच संपुर्ण पुरावे शासकीय अधिकार्यांच्या व जनतेच्या समोर येणार असे प्रिया झांबरे यांनी सांगीतले.