बाबूपेठ क्रीडा संकुल मध्ये क्रिडा साहित्याची दुरूस्ती व क्रिडा सहित्ये उपलब्ध करून द्यावे
अनेक संघटनांनी निवेदन देऊन सुध्दा मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष, तात्काळ साहित्य पुरवठा करा अन्यथा मनपाला ताला ठोकू आप चे राजू कुडे यांचा इशारा
चंद्रपूर – बाबुपेठ मध्ये अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे अनेक दिवसांपासून क्रीडा साहित्याची अवस्था बिकट असून अनेक साहित्य तुटलेले तर अनेक साहित्याची गरज तिथे भासत आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील मनपा लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आप चे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांचे कडे याबाबत तक्रार दिली.
याबाबत आज मनपा आयुक्त मोहिते यांना आप तर्फे निवेदन देण्यात आले. जर तात्काळ साहित्य पुरवठा केले नाही तर आम आदमी पार्टी तर्फे मनपाला ताला ठोकु असे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी म्हटले.
यावेळेस आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला शहर संघटन मंत्री सुजाता ताई बोदेले, संस्थापक सदस्य चंदु भाऊ माडुरवार, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप भाऊ तेलतुंबडे, सुशांत धाकाते, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.