रोगनिदान शिबिरातील ५१ रुग्ण उपचारासाठी सावंगी (मेघे) येथे रवाना
आमदार बंटी भांगडीया व परिवाराची उपस्थिती
तालुका प्रतिनिधी/चिमूर
भांगडीया फाउंडेशन व दत्ता मेघे चॅरिटेबल ट्रस्ट विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या वतीने रुग्ण तपासणी व उपचार शिबिरातून चिमूर तालुक्यातील ५१ रुग्णांना पुढील उपचारासाठी भाजप आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या ऑफिस समोर रुग्ण वाहनास आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत वीनय बियाणी यांचे हस्ते झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले.
यावेळी भांगडीया परिवारातील कु. गौरव भांगडीया, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजू झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, प्रकाश वाकडे, जयंत गौरकर, रमेश कंचर्लावार, समीर राचलवार, विवेक कापसे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, शहर अध्यक्ष दुर्गा सातपुते, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, महामंत्री सुरज नरुले, सचिन बघेल, चिमूर विविध कार्यकारी सेवा संस्था संचालक राकेश कामडी, अमित जुमडे, राजू बलदवा, सतीश जाधव, सुषमा पिंपलकर, भारती गोडे, साखरकर मॅडम, समीना शेख, दिलीप नलोडे, एकनाथ धोटे, शुभम भोपे, नैणेश पटेल आदी उपस्थित होते.
५१ रुग्णांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. सर्व रोग निदान व उपचार शिबिरासाठी एकनाथ थुटे व जयंत गौरकर यांनी विशेष कमान घेऊन त्यांनी रुग्णांच्या सेवेत पुढाकार घेत कार्य केले.