डॉ. गोसाई बोढे विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील यांची विशेष उपस्थिती
नितेश शेंडे, प्रतिनिधी
नांदाफाटा: कोरपना तालुक्यातील एकोडी (भोयेगाव) येथील डॉ. गोसाई बोढे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे विदर्भ गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला आहे. डॉ गोसाई बोढे मूळचे एकोटी येथील असून त्यांनी आचार्य भाऊसाहेब झिटे ( संचालक आंतरभरती होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रुग्णालय ) यांच्या कडून प्रेरणा घेऊन विदर्भातील पाहिले आणि जगातील दुसरे 15 बेडचे होमिओपॅथी आंतररुग्णालय तयार केलेले असून या रुग्णालयांत दुर्धर आजारावर उपचार केले जातात. व्याधीग्रस्त रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आशेच्या किरण असून नवीन होमिओपॅथसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.
त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना विदर्भ गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नुकतेच शेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील,आमदार संजय कुठे, आमदार आकाश फुंडकर, माजी खासदार कैलास पाटील, प्रवीण जोशी, विकास दहिया,सतीशचंद्र भट, डॉक्टर सतीश कराळे,डॉक्टर नितीन राजे पाटील, डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर खुशाल नारनवरे यांच्या उपस्थित डॉक्टर बोर्डे यांना सन्मानित करण्यात आले आहे.