“रोजगार दो”! वर्धा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस तर्फे प्रधानमंत्री यांच्या जन्मदिनानिमित्त बेरोजगार दिवस पाळून निवेदनातून केली मागणी
अनंता वायसे
“रोजगार दो” ही आज च्या युवकांची गरज आहे. रोजगार प्रश्नावर वर्धा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस यांनी मा. पंतप्रधान मोदी जी यांचा वाढदिवस हा बेरोजगार दिवस म्हणुन हिंगणघाट, वर्धा, आर्वी येथे दिले निवेदन देण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे युवा बेरोजगार झाला आहे आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
सरकार 2 करोड रोजगार निर्माण करणार हे आश्वासन लोकांना देऊन सत्ता मध्ये आले होते पण काही चुकीच्या युवा विरोधी धोरणामुळे आज कोरोना काळा मध्ये २४.2 लाख लोक बेरोजगार झाले आहेत असा CMIE च डाटा आहे. या सरकार कडे रोजगार निर्माण करायचा नवीन व्हिजन नाही आहे म्हणून वर्धा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस तर्फे आज महात्मा गांधी जी यांचा अहिंसा मार्ग अवलंबून पंतप्रधान मोदी जी यांना गुलाब फूल सप्रेम भेट देऊन देव आपणाला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करीत रोजगार दिवस साजरा करण्यात आला.
केंद्र सरकार ने रेल्वे सारख्या अनेक विभाग ची नवीन भरती रद्द केली आहे. केन्द्र सरकार नी यावर पुनर्विचार करावा आणि बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा.
यासाठी जिल्हाध्यक्ष प्रतिक जी भोगे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद जी दिघीकर, जिल्हा महासचिव हिमांशु ठाकरे, जिल्हा मीडिया अध्यक्ष गौरव चांभारे, जिल्हा सचिव शंतनु लाखे, जिल्हा सचिव विक्की वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
वर्धा मध्ये सेलु तालुका महासचिव शुभम भोवरे, अविनाश जी सेलुकर जिल्हा संघटक कांग्रेस कमेटी, नंदु जी कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कांग्रेस कमेटी, श्रीकांत धोटे शहर सचिव कांग्रेस कमेटी, विशाल भोयर, प्रविण शेंडे हिंगणघाट मध्ये तालुका अध्यक्ष विरेंद्र कांबळे,तालुका महासचिव युवक कांग्रेस शैलेश मैंद, तालुका उपाध्यक्ष प्रविष गोडघाटे, तालुका संघटक वैभव मानकर, प्रणय सातघरे, हर्षल बालपांडे आर्वी मध्ये तालुका उपाध्यक्ष सौरभ पुणेवार, तालुका महासचिव विक्रांत नाल्हे, युवक काँग्रेसचे अक्षय राठोड, संकेत येवतकर यांनी निवेदन दिले.