महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

0
754

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याचे महसूल कर्मचाऱ्यांना आश्वासन

 

 

चंद्रपूर – राष्ट्रीय पेंशन योजना हटवून जुनी पेंशन योजना सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याने शिष्टमंडळ ला दिले.

 

दिनांक – ७ डिसेंबर , २०२१ रोजी शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचे वतीने दिनांक ४ एप्रिल , २०२२ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. यात राष्ट्रीय पेंशन योजना हटवून जुनी पेंशन योजना सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू करावी, परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील सभासदांच्या सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना विनाअट सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात यावा, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३ % वरुन २० % करावीत,  महसूल सहायक , शिपाई व कोतवाल संवर्गाचे रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरावीत, नायब तहसीलदार पदांचा ग्रेड पे रु . ४३०० / – वरुन रु .४६०० / – करणेबाबत, दांगड समितीच्या अहवालानुसार आकृतीबंध लागू करावा. दांगड समितीचा अहवाल प्रसिध्द करुन अंमलबजावणी करावी, महसूल विभागातील बऱ्याच कालावधीपासून अस्थाई असलेले पदे स्थाई करावीत, अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती तात्काळ देण्यात यावी, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याबाबतची आहे ती प्रक्रीया कायम ठेवण्यात यावी, महाराष्ट्रात नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात आलेले करण्यात आलेल्या ठिकाणी नविन पदांची निर्मीती करुन मिळणेबाबत, गृह विभागाचे धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय कॅशलेस सुविधा राबविणेबाबत, संजय गांधी , इंदिरा गांधी , निवडणूक, रोजगार हमी योजना , पीएम किसान इत्यादी महसूलेत्तर कामांसाठी स्वतंत्र पदे निर्माण करण्यात यावीत, गौणखनिज विभागांत खनिकर्म निरीक्षक हे अव्वल कारकून दर्जाचे पद निर्माण करण्यात यावे, राज्य स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धा दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावे, महसूल दिन दरवर्षी राज्य , विभाग व जिल्हा स्तरावर साजरा करावा व त्याकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा . आदी १५ मागण्याकरीता शासन स्तरावरुन लवकरात लवकर बैठक आयोजित करुन महसूल विभागाच्या मागण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here