क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत
शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था
थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत आमदार किशोर जोरगेवार यांनी अभिवादन केले. याप्रसंगी शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया समोर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी यंग चांदा ब्रिगेेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, करणसिंह बैस, सायली येरणे, राम जंगम, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, बादल हजारे, सविता दंडारे, आशा देशमुख, देवा कुंटा, चंद्रशेखर देशमूख यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रेला महात्मा ज्योतिबा फुले संस्कृती सभागृह जवळून सुरवात झाली. सदर शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया जवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करत महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.