नियोजनबद्ध अभ्यास करा, यश पायाशी लोटांगण घालेल- अतुल तराळे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयात मार्गदर्शन
तालुका प्रतिनिधी चिमूर
अभ्यासाचे मोठे बर्डन आहे. असा विचार न करता,विशिष्ट ध्येय ठरवून नियोजनबद्ध पध्दतीने एन्जॉय करत अभ्यास करा.यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेलं असा यशाचा मूलमंत्र नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. ते नेचर फाऊंडेशन द्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयात आयोजित सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
या वेळी अध्यस्थानी प्रा. गजभिये तर विशेष अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते,प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार पंकज मिश्रा,नेचर फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण भीमटे, सचिव निलेश नन्नावरे,प्रा.प्रफुल राजुरवाडे, प्रा. कत्रोजवार उपस्थित होते. पुढे बोलताना उपनिरीक्षक तराळे यांनी आपली पार्श्वभूमी सांगत आपले या विषयी अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.ध्येय निश्चित करून प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळातो असा विश्वास व्यक्त करीत विद्यार्थ्यांशी वार्तालाप साधला.या वेळी सचिव निलेश नन्नावरे यांनी अभ्यास तुमचा,संकल्प आमचा या घोषवाक्याची विस्तृत माहिती देत.विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली. या वेळी उपनिरीक्षक भीष्मराज सोरते,प्रा.गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गाची चाळणी परीक्षा घेण्यात आली.यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भीमटे,संचालन समीक्षा नन्नावरे तर आभार प्रा.अतुल वाघमारे यांनी व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.राजुरवाडे,प्रा.कत्रोजवार,नेचर फाऊडेशन चे मिथुन सोगलकर, अमोल कावरे,प्रमित बेले,नितेश कामडी,शुभम अथरगडे,सुरज कामडी यांनी परिश्रम घेतले.