आपले कौशल्य आपली मदत
हिंगणघाट तालुक्यातील जांगोना या गावात या लॉकडाऊन काळात गावातील सर्व युवक मंडळी यांच्या सहकार्याने आपल्यात असलेल्या कालाकौशल्याच्या आधारे येणाऱ्या परस्थितीतून सामोरे जाण्याकरीता सहकार्याची/मदतीची कास धरली आहे, यात मुलांनी “आपले कौशल्य अपल्यांची मदत” या हेतूने सर्वांनी आपल्याला जे जमेल ते लहान मुलांन करीता आज जांगोना या गावात करीत आहे. या करोना-१९ च्या काळात मुलांचे शैक्षणिक तसेच शारीरिक नुकसान न व्हावे. सतत घरी राहणे, टीव्ही, मोबाईल बघणे. यामुळे मुलांन मध्ये शारीरिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, असे बरेच शिक्षक,पालकांना वाटत असे परंतु जांगोना या गावातील युवकांनी या मुलांना या पासून दूर ठेवण्या करीता जांगोना स्पोर्ट क्लब तयार करून मुलांना वेगवेगळे खेळ, व्यायाम शिकवीत आहे. तसेच खेळात मुलांना शैक्षणिक धडे सुद्धा मुलांना मिळत असल्याने मुलांन मध्ये व पालकांन मध्ये उत्साह वाटत आहे. यात लॉकडाऊन काळात जे मुले बाहेर (शहरी भागातून) आले आहे अशांनी यात सक्रिय सहभाग दर्शवित आहे. यात नॅशनल फुडबॉल पट्टू कु.दामिनी पदमाकर राऊत ही कोच व मार्गदशक म्हणून काम करीत आहे. नक्कीच या गावातून आणखी मुले समोर जातील व आपल्या गावाचे सोबतच जिल्हा, राज्याचे नाव रोशन करतील असा विश्वास दामिनी यांचा आहे.