सार्वजनिक ठिकाणी महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन मारपीट करणाऱ्या विकृताला ठेचून काढा

0
750

सार्वजनिक ठिकाणी महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन मारपीट करणाऱ्या विकृताला ठेचून काढा

■ भांदवी कलम ३५४ व २९४ अंतर्गत कारवाई करा

■ ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

 

मुल : जिल्ह्यात एका अनोळखी महिलेला निर्वस्त्र करुन शिर धडावेगळे करुन ठार केल्याची घटना संतप्त असताना मुल तालुक्यातील विरई येथे तेथील धर्मेंद्र गोंगले यांनी शुल्लक कारणावरून तेथीलच एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन सार्वजनिक ठिकाणी मारपीट करुन त्यांच्या मदतीला येणाऱ्या पती व दिराला बेदम मारुन जखमी केल्याची घटना घडली. घटना गंभीर असताना सुद्धा पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करीत आरोपीला रान मोकळे केले आहे. या घटनेला ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष यांनी भेट देऊन प्रकरणाचे गंभीर गांभीर्य जाणून घेऊन मोकाट सुटलेल्या आरोपीवर भांदवी कलम ३५४ व २९४ अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशा मागणी केली आहे.

सविस्तर वृत्तांत याप्रमाणे की मुल तालुक्यातील विरई येथील आरोपी धर्मेंद्र गो़ंगले यांचा घराशेजारी राहणाऱ्या सोबत शुल्लक कारनावरुन वाद झाला. या वादाची चिंगारी मोठ्या भांडणात होऊन आरोपीने फिर्यादी महिलेला सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात अडवून तिला अश्लिल शिवीगाळ करीत तिचे केस पकडून खाली पाडले व मारपीट केली. फिर्यादी महिलेला वाचविण्यासाठी तिचा पती व दिर आला असता पतीला मारहाण करून दिराला बेदम मारहाण करून त्याचे डोके फोडले व गंभीर जखमी केले. त्यांच्यावर चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढी गंभीर घटना घडून सुद्धा मुल पोलिसांनी भांदवी कलम ३२३, ५०४,५०६ अंतर्गत थातूरमातूर कारवाई करुन आरोपीला रान मोकळे केले आहे. ह्या निंदनीय बाबींचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करुन पिडीत फिर्यादी ला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर भांदवी ३५४, २९४ अंतर्गत कारवाई करुन फिर्यादी ला सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी केली आहे. अन्यथा अशा विकृताला समाज ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. अशी भुमिकाही घेण्यात आली.

यावेळी उपस्थित ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, सकीना फुलझेले, प्रकाश फुलझेले, अजय ठेमस्कर, बंडू गोंगले, रत्नदीप उराडे, युगांत गोंगले, सुबोध उराडे, बलराज उराडे, सुधाकर गोंगले, पुरषोत्तम गोंगले, लिलाधर गोंगले, प्रमोद गोंगले, मोगली गोंगले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here