‘तरुणीची निर्घृण हत्या’ शिरच्छेद करुन विवस्त्र अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या आरोपीचा शोध लावून कठोरात कठोर कारवाई करा
वंचित बहुजन महिला आघाडी भद्रावती ची मागणी
दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी भद्रावती शहरातील सुमठाणा-तेलवासा मार्गावर तरुणीची निर्घृण हत्या व शिरच्छेद करुन विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढ़ळुन आला. तरुणीचे शीर (डोक) कापून असून शीर अजुनपर्यंत मिळालेले नाही. भद्रावती तालुक्यातील अश्या प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ह्या घटनेमुळे भद्रावती तालुक्यातील महिलामध्ये भितीचे वातावरण असून महिलामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तरी सदर प्रकारणामध्ये सखोल चौकशी करुन आरोपींचा शोध घेवून आरोपिवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला आघाडी च्या वतीने करण्यात आली.
तसेच भद्रावती शहरामध्ये रात्रो ८ वाजेनंतर पोलिस गस्त वाढविण्यात यावी. भद्रावती शहरामधे कॉलेज च्या तरुण मुलामधे अमली पदार्थाचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरामधे अवैध अमंली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. अमंली पदार्थ विक्रिस आळा घालण्यात यावा. अश्या प्रकारे मागणीचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडी तालुका व शहर शाखा भद्रावती तर्फे पोलिस निरीक्षक मा. भारतीय यांना देण्यात आले.
सदर निवेदन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संध्याताई पेटकर, शहराध्यक्षा तथा नगरसेविका राखीताई रामटेके ह्यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदन देताना नगरसेविका सीमाताई ढेंगळे, नगरसेवक सुनील खोब्रागड़े, कपुरदास दुपारे, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक सुशिल देवगड़े, लताताई टिपले, वैशाली चिमुरकर, मिली वाघ, गिताताई वाळके, जयवंताबाई मेश्राम, वैशाली चहांदे, आरती पाटिल, सुकेशिनी चहांदे, सुप्रिया चहांदे, दीक्षा उमरे, रांची पुणेकर, छाया सहारे, अनीता मेश्राम, चंद्रकला गेडाम, कविता चांदेकर, प्रिया कांबळे, दीपाताई चांदेकर, नीताताई मेश्राम हजर होते