नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकाचा सत्कार व स्पर्धा मार्गदर्शन शिबिर
नेचर फाउंडेशनचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
चिमूर
तालुक्यातील शिवापूर(बंदर)येथील रहिवाशी असलेला अतुल अरुण तराळे नामक युवक नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाला.त्याचा या यशाचं कौतुक म्हणून नेचर फाउंडेशन नागपूर द्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय,चिमूर येथे रविवारचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य पाटील तर विशेष अतिथी म्हणून चिमूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज गभने,प्रमुख अतिथी म्हणून भिशी येथील वरीष्ठ पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित राहणार आहेत.
या सत्कार समारंभानंतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे मार्गदर्शन करणार आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नेचर फाउंडेशन,नागपूर चे सचिव निलेश नन्नावरे यांनी केलं आहे.