गडचांदुर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र पुरस्कृत वाढत्या महागाई विरोधात निषेध व धरणे आंदोलन

0
786

गडचांदुर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र पुरस्कृत वाढत्या महागाई विरोधात निषेध व धरणे आंदोलन

 

कोरपना प्रतिनीधी
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र शासन द्वारा पेट्रोल, डिझेल, गेस व महागाई विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन सन्माननीय विठ्ठलराव थिपे अध्यक्ष कोरपना तालुका काँग्रेस कमिटी यांचा नेतृत्वात आयोजित करण्यात आले.
सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. गटनेते विक्रम येरणे यांनी वाढती महागाई, गगनाला भिडलेले इंधनाचे दर या बाबत केंद्रातील मोदी सरकारचे चुकलेले धोरण या बाबत प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ नेते हंसराज जी चौधरी यांनी फसलेल्या उज्ज्वला गॅस मुळे सामन्यांची होत असलेली कुचंबणा अधोरेखित केली. नगराध्यक्षा सविता ताई टेकाम यांनी महिलांचे अश्रू पुसण्याचे सांगून सत्तेत आलेल्या मोदी सरकार ने आज महिलांना रडकुंडीला आणले आहे असे सांगितले.
शहर काँग्रेस कमिटी तर्फे खाली सिलेंडर ला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
निषेध सभेला ज्येष्ठ नेते धनंजय उर्फ बाबा पाटील गोरे, उपसरपंच आशिष भाऊ देरकर, सभापती अरविंद मेश्राम, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, नगरसेवक राहुल उमरे, अर्चना ताई वांढरे, जयश्री तकसांडे, शिवाजी वांढरे युवक शहर अध्यक्ष रुपेश चुदरी, युवा नेते सतीश बेतावार,देविदास मुन, कोवन काटकर, प्रितम सातपुते, गणेश आदे, इंदर सिंह कश्यप, राहुल ताकसांडे तालूका व शहर काँग्रेस कमेटी चे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, ओ.बी.सी सेल, एन एस यू आई, अल्पसंख्यांक सेल, सर्व फ्रंटलं सेल पदाधिकारी उपस्थित राहून जनविरोधी केंद्र शासन विरोध आंदोलनाला यशस्वी केले.
संचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे तर आभार तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here