अन् जिल्हा परिषद शाळेत पार पडली प्रात्यक्षिक निवडणूक

0
705

अन् जिल्हा परिषद शाळेत पार पडली प्रात्यक्षिक निवडणूक

● मॅजिक बस फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम

मतदान केल्यानंतर विदयार्थी

नांदा : निवडणूक म्हटल की गाव गल्लीतील नागरिकांचा चर्चेला ऊत व राजकिय वातावरण तापलेले दिसून येते असाच काहीसा प्रकार नांदा येथील जि. प. शाळेत दिसून आला त्याच उत्साहात आणि त्याच जोशात बाल पंचायतराज या समिती करिता प्रात्यक्षिक निवडणूक पार पडली.

मॅजिक बस फौंडेशन अंतर्गत जी प प्राथमिक शाळा नांदा (म.) येथे जीवन कौशल्य सत्र घेण्यात येत असताना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक प्रकिया समजून घेने तसेच निवडणू आलेले बालपंचयत सदस्य प्रत्यक्ष शाळेच्या विकासासाठी काम करतील याच उद्देशाने नांदा जिल्हा परिषद शाळेत प्रात्यक्षिक निवडणुक घेण्यात आली.

राज्य आयोग ज्या नीकशा नुसार निवडणूक घेतात अगदी त्याच पद्धतीने शाळेत निवडणूक घेण्यात आली. आठवड्या पूर्वी सहा पॅनल चे फॉर्म भरून घेतले. त्या पॅनल ला चिन्ह वाटप करण्यात आले. नंतर सात दिवस प्रचार करण्या साठी वेळ देण्यात आला. एवढेच नाही तर वर्गा नुसार त्यांची मतदार यादी बनविण्यात आली. आणि मतदान करतांना ओळखपत्र आधार कार्ड दाखवूनच मोबाईल EVM ॲप्स द्वारे मतदान घेण्यात आले.

प्रसंगी 125 विद्यार्थ्यांनी निवडणुक प्रक्रियेत सहभाग घेत मतदान केले. निवडणुकीत 6 पॅनल नी भाग घेतला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पॅनल विजयी ठरले.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणुन शाळेतील शिक्षक गोविंद गुप्ता, गुलाब राठोड, लता खुसपुरे, शा. व्य. स अध्यक्ष. तोहीत शेख उपस्थित होते.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर तसेच क्लस्टर मॅनेजर नितेश मालेकर यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष बाल पंचायत निवडणूक घेण्यात आली. प्रात्यक्षिक निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पडण्या करिता मॅजिक बस फौंडेशन चे शाळा सहायक अधिकारी भूषण शेंडे, सहकारी मुकेश भोयर, सोनू पंडित व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here