सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती तालुक्यातील समस्या घेऊन पोहचले जिल्हाधिकारी कार्यालयात!
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू…
सम्यकचे जिल्हा अध्यक्ष धीरज तेलंग यांचा इशारा!
ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुका हा निर्मिती पासून ग्रामीणच राहिला आहे. आजपर्यंत तालुक्यात मूलभूत सुविधांची पूर्तता झाली नाही . फक्त निवडणुकां पुरतीच तालुक्याची आठवण राजकीय नेत्यांकडून केली जाते.
सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात सदर निवेदन मा.जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना निवेदनातूनया तालुक्यातील लोकांची गैरसोय होत असल्याबद्दल कलेक्टर आणि जिल्हा नियोजन मंडळाला सूचना देऊन बजेटमध्ये तरतूद करावी असे सांगण्यात आले, त्यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष इंजि. मा. भूषण फूसे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यात नेटवर्क चा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे तिथे टॉवरची निर्मिती करण्यात यावी. तसेच तालुक्यातील रुग्णालय हे फक्त टोल नाक्याप्रमाणे झाले आहे .फक्त रुग्णाचा वेळ वाया जातो कोणत्याही सुविधा नाहीत. रुग्णांना योग्य सुविधा देण्यात. तेथील तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे नाहीत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीचे पट्टे द्यावे. विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नोकरीवर लागलेल्या तेथील स्थानिक लोकांना जात पळतळणी चे सर्टिफिकेट निघण्यासाठी खूप मोठी समस्या होत असते त्या करिता आपण उपाययोजना करावी.
रस्त्याची दुरावस्था मोठा प्रश्न आहे, त्याचे निराकरण करावे. विध्यार्थ्यांन साठी वाचनालये नाहीत त्याची निर्मिती करण्यात यावे व शासकीय वसतिगृह नाहीत तालुक्यातील वसतिगृहे उभे करण्यात यावे. तालुक्या त येण्या जाण्या साठी बसेस नाही ते टाइम वर सोडण्यात यावे आणि बस्थनाके सुद्धा नाही ती सुद्धा उभारण्यात यावे.
पिण्याच्या पाण्याचा टाकी आहे, परंतु त्या टाकीत पाणीच नाही.वापरण्याचा पाणी ची सुद्धा नाही, स्थानिक पातळीवर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.त्याचे निराकरण करण्यात यावे. तिथे न्यायालय (कोर्ट) नाही त्याची सुद्धा उभारणी करण्यात यावे. शिक्षण व्यवस्थेचे योग्य सोय नाही ( एकाच वर्गात 1 पासून ते 9 पर्यंत शिक्षण दिले जातात) त्यावर उपाययोजना करावी. शेतीसाठी लागणारा पाणी नसल्यामुळे पावसावर अवलंबून राहावं लागतं, तिथे तलाव तयार करण्यात यावे.
जिवती तालुक्यात रोजगार नाही त तेथील स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करावा. विजेचा तुटवडा खूप मोठा प्रश्न स्थानिक लोकांना भेडसावत असतो. पावसाळ्यात 5 ते 6 दिवस विजेचा पुरवठा बंद असतो त्याची 24 तास लाभ घ्यावा. तेथील युवकांसाठी व्यायाम शाळा, खेळण्याचे ग्राउंड नाही. त्यामुळे तिथला युवक जिल्हा पातळीवर जाऊन शहराच्या ठिकाणी पैसा खर्च करून त्याचा लाभ घेतो. तो तिथेच त्याच्या साठी व्यायाम शाळा आणि खेळण्याचे ग्राउंड उभारावे अश्या एकूण 15 मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे नागराज कांबळे, प्रशिक खांडेकर, क्षितिज इंगळे, राजू हरगीले, आकाश ससाणे, नम्रता सावंत, ऍड.क्षितिज मेंढे, प्रणाली जिवने, निकिता कांबळे, पूजा कोटनाके, प्रतीक्षा चौधरी, प्रदीप गोतावळे, शुद्धोधन बनसोडे, भिमराज बागेसर इत्यादी सम्यकचे पदाधिकारी व विधार्थी यांची उपस्थिती होती.