शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा येथे जोडे मारुन निषेध आंदोलन
राजुरा (चंद्रपूर), 28 मार्च : हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतलाय. ऍड. प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद राज्यभरात उमटत असून ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहेत.
या आंदोलनाचे आज पडसाद राजूऱ्यात उमटले. संविधान चौक राजुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांच्या प्रतिमेला काळिमा फासत ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बांगर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी बांगर यांच पद रद्द करावं, अशी मागणी केली.
हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशा आमदारांना पक्षप्रमुखांनी पाठीशी न घालता ठोस कारवाई करण्याची करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा आयटी प्रमुख अमोल राऊत, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, कोरपना तालुका अध्यक्ष मधुभाऊ चुनारकर, राजुरा तालुका महासचिव रविकिरण बावणे, महासचिव सदानंद मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, सुरेंद्र फुसाटे, सुभाष हजारे, राहुल अंबादे यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.