वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता मेळावा संपन्न
आगामी काळात होऊ घातलेल्या जिप व पंस निवडणुकांच्या अनुषंगाने ब्रम्ह्पुरी तालुक्यातील मौजा खेडमक्ता येथे वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी व खेडमक्ता-मालडोंगरी जिप सर्कल च्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भुषण फुसे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन अरविंद सांदेकर पूर्व विदर्भ समन्वयक, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कविता गौरकार जिल्हाध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर, डॉ. प्रेमलाल मेश्राम जिल्हा सल्लागार, सुखदेव प्रधान जिल्हा सदस्य चंद्रपूर तर प्रमुख अतिथि म्हणुन ललिता गेडाम ज्येष्ट सल्लागार महिला आघाडी, लक्ष्मण बागडे ओबीसी नेते चिमूर, महेंद्र ठाकुर चंद्रपूर, अक्षय लोहकरे चंद्रपूर, मारोती मेश्राम जेष्ठ कार्यकर्ते, पध्मिनि धनविजय तालुका अध्यक्षा महिला आघाडी ब्रम्ह्पुरी यांनी स्थान भुषविले. तथा उपस्थित सर्व गावकरी व कार्यकर्त्यांना अतिशय मोलाचे संघटनात्मक मार्गदर्शन केले.
आगामी काळात होणाऱ्या सर्व जिप व पंचायत समितीच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीनिशी लढेल तसेच ‘गांव तिथे शाखा’ तयार करुन जास्तीत जास्त सर्व घटकातील लोकांनी वंचित मध्ये सहभाग घ्यावा व आपली सत्ता आपणच निर्माण करुन आपले प्रश्न सोडवावे असे मत जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या काळात दारु, साड्या, मिक्सर, पैसा घेऊन आपण मनुवादि पक्ष्यांना दबेल न राहता प्रामाणिक मतदान करुन आपल्या हक्काची बहुजनांची सत्ता स्थापन करुन स्वतःचे शिलेदार स्वतःच बनावे. वंचीतांची सत्ता गावापासून ते देशाच्या पातळीवर निर्माण करावी असा मोलाचा संदेश विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांनी दिला. तसेच गावाच्या आणि देशाच्या राजकारणात महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन समाजहिताचे व स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी पिढी घडवावी. आज ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले, उद्या शिक्षणातील जाईल नंतर नोकऱ्यातील जाईल. तेव्हा स्वतःचे प्रश्न सोडवायचे असतील तर वंचीतांची सत्ता निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही, असा मोलाचा सल्ला कविता गौरकार जिल्हाध्यक्षा महिला आघाडी यांनी उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाचे आयोजन खेडमक्ता-मालडोंगरी जिप सर्कल प्रभारी तथा तालुका महासचिव लिलाधर वंजारी यांनी केले. तर मोलाचे सहकार्य अनंता मेश्राम, अश्व्जीत हुमने, नरेंद्र मेश्राम, प्रफुल्ल ढोक, सुरेश बागडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम रामटेके यांनी तर पाहुण्यांचे आभार उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी मानले.
यावेळी महिला आघाडी महासचिव सुकेष्णि बनसोड, किरण मेश्राम, शीला निहाटे, प्रतिभा मेश्राम, रेखा गज्घाटे, पुष्पा बनकर, अलका माटे, लक्ष्मी राखडे, वनिता तामगाडगे, निखिल फूल्झेले, शरद मेश्राम, आनंदराव मेश्राम, अभिमन फुलझेले तथा गावकरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.