जनसंपर्क व तक्रार निवारण मेळावा संपन्न
गडचांदुर, 26 मार्च : आज बल्लारपूर विभागातील गडचांदूर उपविभागातील कृषी ग्राहकांसाठी गडचांदूर उपविभाग येथे कृषी मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित स व सु उपविभाग गडचांदुर ग्राहक जनसंपर्क व तक्रार निवारण मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रादेशिक संचालक नागपुरचे सुहास रंगारी, प्रादेशिक GM दाहेधार, चंद्रपुर परिमंडल मुख्य अभियंता सुनील देशपांडे, चंद्रपुर मंडल अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, बल्लारशाह विभाग कार्यकारी अभियंता संदेश ठवरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बल्लारशाह विभाग महेश तेलंग व गडचांदूर उपविभाग येथील सर्व अभियंता सह येथील सर्व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रतिसाद देत 216 कृषिग्राहकांनी 3562380 एवढी रक्कम प्रादेशिक संचालक नागपुरचे सुहास रंगारी यांच्या समक्ष भरून थकबाकी मुक्ततेकडे पाऊल टाकले. तसेच एकूण 81 ग्राहकांनी पूर्ण थकबाकीचा भरणा करत पूर्णता थकबाकी मुक्त झाले. या मेळाव्यात 11 ग्राहकांच्या वीजबिल तक्रारी महावितरण गडचांदूर उपविभागाने सोडवल्या. तसेच HT ग्राहक गुरुदेव कॉटन प्रोसेसिंग कंपनी यांच्या कडून 283190 रुपये व HT ग्राहक स्वप्नपूर्ति फूड प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड यांच्याकाडून रुपये 276950 प्राप्त झाले.