अवैधरित्या रेती, लालमाती व काळी माती खनीज संपत्ती तस्करी करणाऱ्यावर कारवाई करा

0
717

अवैधरित्या रेती, लालमाती व काळी माती खनीज संपत्ती तस्करी करणाऱ्यावर कारवाई करा

भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडीया याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : राजुरा क्षेत्रातील खनीज संपदा भरपूर प्रमाणा असल्यामुळे ही संपदा शासकीय दरानुसार लिलाव होत असते परंतु काही वर्षापासुन किंवा काही महिण्यापासुन रेती घाट लिलाव करण्यात आलेला आहे किंवा नाही याची सुचना सुध्दा या निवेदनाच्या माध्यमातुन आमच्या संघटनेला देण्यात यावे. विशेष बाब या प्रमाणे आहे की, राजुरा या क्षेत्रातून दररोज नियमित रेती हायवामध्ये भरुन नियमित तस्करी करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे खनीज संपदा असलेली लाल मातीची सुध्दा अवैधरित्या उपसा करुन तस्करी करण्यात येत आहे. या अवैध तस्करीला कोणत्या विभागाचे व अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे हेच कळत नाही या पुर्वी आमच्या संघटनेमार्फत अनेक वेळा तक्रार व सुचना संबंधीत विभाग व अधिकानंना वेळोवेळी देण्यात आलेले असुन सुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाही न करता उलट त्याचे परिणाम असे की रेती तस्करी व माती तस्करी मोठ्या प्रमाणात आणि जोमाने सुरु असतात याचे कारण काय ? अधिकाऱ्यांना सुचना निवेदन दिले तर टाळाटाळ करीत असून तो काम माझे नाही तो तहसिलदार बघणार किंवा पुलिस विभाग बघणार किंवा तो फॉरेस्ट विभाग बघणार अशा पध्दतीचे अशोभनिय व गैर जवाबदार उत्तर अधिकारी वर्गाकडून मिळत असते आणि तो मी नव्हेच अशी भुमिका वर्तमान परिस्थितीमध्ये अधिकारी वर्ग बजावत आहे असे दिसुन येते ? जर रेती तसेच लालमातीच्या लिलाव झाला असेल तर प्रत्येक ट्रक मालकांनी रेती आणि लालमाती याची टि.पी. सोबत ठेवावे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शाहनिशा असलपेल्या पुराव्याची प्रत सुध्दा ठेवावे आणि कंत्राटदाराला किती वर्षासाठी किंवा महिण्यासाठी रेतीघाट उपसण्याकरीता दिलेला आहे. याचे नमुद सुध्दा करण्यात यावे आणि कंत्राटदाराला किती ब्रास रेती व लालमाती उचलण्याचे परवाने देण्यात आले तेही सुध्दा नमुद करण्यात यावे याचे कारण असे की, जे योग्य आहे त्याला भितीची गरज नाही परंतु रेती तसेच लालमाती उपसा रात्रीच का करण्यात येते याचा सुध्दा विभागाने खुलासा करावा जेने करून जेव्हा रेती कंत्राटदार घाट वरुन उचलतो तेव्हा विभागातील कोण-कोणते अधिकारी उपस्थित राहतात याची नोंद सुध्दा नमुद करावी या सर्व बाबीवर आळा घालण्याकरीता या सर्व गाडीमधुन दररोज रितसर रेती वाहतुक होत असते याची सखोल चौकशी कोणतीही पक्षपात न करता त्वरीत करण्यात यावे जर असे नाही केले तर आमच्या संघटनेमार्फत बामणी चौक येथे चक्का जाम करुन रेती व लाल मातीचे संपूर्ण ट्रक अडविण्यात येणार याची दक्षता आपल्या विभागाने घ्यावी.

गाडी क्र. एमएच ३४ एम ७६००, एमएच-३४ ३२३१, एमएच-३४ एम ८०८२, एमएच-४० एन २७३९, एमएच-३४ एम ७३४५, एमएच-३४ एई ०३७६, एमएच-३४ एव्ही १३१२, एमएच-३४ एम ८२८७, एमएच-३४ डी जे ७२७४, एमएच-३४ १८८१ या सर्व गाडीची चौकशी करून दोषी असल्यास कार्रवाई करावे.

समधीत अधिकाऱ्यानी कठोर ते कठोर पाऊल उचलून अवैध तस्करी खनिज संपदा थांबविन्या साठी ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑल इंडिया पदाधीकाऱ्यांनी निवेदन दिले या सर्व गाडीमधुन दररोज रितसर रेती वाहतुक होत असते याची सखोल चौकशी कोणतीही पक्षपात न करता त्वरीत करण्यात यावे जर असे नाही केले तर आमच्या संघटनेमार्फत बामणी चौक येथे चक्का जाम करुन रेती व लाल मातीचे संपूर्ण ट्रक अडविण्यात येणार याची दक्षता आपल्या विभागाने घ्यावी
गाडीची चौकशी करून दोषी असल्यास कार्रवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here