पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी बनली सट्टाबाजाराचे केन्द्र

0
685

पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी बनली सट्टाबाजाराचे केन्द्र

पिंपळगाव रोडवरील कृष्ण नगरीमध्ये याच ठिकाणी सट्टापट्टी जुगार घेतला जातो

कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर नांदा येथील पिंपळगाव रोडवरील कधीकाळी सुनसान पडलेली कृष्णनगरी सट्टापट्टी व्यवसायाचे केंद्र बनले असून राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्याने येथील सट्टापट्टी केंद्र जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

नांदाफाटा बाजारपेठेत अण्णा नामक व्यक्ती दुकान भाड्याने घेऊन मागील आठ महिन्यापासून खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय चालवित होता जणु या व्यवसायाला सरकार मान्यताच आहे कि काय दोन महीन्या पुर्वी गढचांदूर पोलीसांनी अण्णा नामक व्यक्तीसह चार जणांवर सट्टापट्टी चालवीत असल्याने जुगार कायद्याअंतर्गत कारवाई केली होती पोलिसांच्या कारवाईनंतर बाजारपेठमधील सट्टापट्टीचा व्यवसाय बंद झाला त्यानंतर लगेचच सुत्र हलली पिंपळगाव रोडवरील कृष्ण नगरी सट्टापट्टी व्यवसायाचे केन्द्र बनली अण्णा नामक व्यक्तीने बाकायदा ४ हस्तक ठेवून सट्टापट्टीचा धंदा वाढविला धंदा वाढताच हप्ता वाढविण्याची मागणी होऊ लागली अण्णा नामक व्यक्तीला हप्ता परवडत नसल्याने महिन्याभरापूर्वी त्यांने सट्टापट्टीचा व्यवसाय गुंडाळला अण्णाचा धंदा बंद होताच कोरपना येथील एका लाॅटरी व्यावसायिकांकडून पिंपळगाव रोडवरील कृष्णा नगरीमध्ये खुलेआम सट्टापट्टी घेणे सुरु झाले आहे परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी लावत असून येथे झंडीमुंडीचाही खेळ खेळविला जात असल्याची चर्वा आहे दररोज लाख रुपयाचेवर सट्टापट्टीचा व्यवसाय होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे प्रशासनाचा आशीर्वाद व राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरु आहे जिल्हा पाेलिस अधीक्षक यांनी लक्ष देऊन येथील सट्टापट्टी व्यवसाय बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

लाखोंचा हप्ता भरा सट्टापट्टीचा धंदा करा अण्णा नामक व्यक्ती सट्टापट्टी व्यवसाय चालविण्याकरिता लाख रूपयाचे वर हप्ता देत असल्याचे त्याचे हस्तक सांगतात हप्ता वाढविण्याची रट सुरु होती परवडत नसल्याने अण्णाने सट्टापट्टी व्यवसाय गुंडाळला अण्णाने सोडताच कोेरपना येथील एका लाॅटरी व्यावसायिकाने हप्ता वाढवून पिंपळगाव रोडवरील कृष्णनगरी येथे सहा सात कर्मचारी ठेवून मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी व्यवसाय सुरू केला आहे कधीकाळी सुनसान असलेली कृष्णनगरी आता अवैध धंद्यासाठी प्रसिद्धी झोतात आली आहे लाखोंचा हप्ता भरा सट्टापट्टीचा व्यवसाय करा असा नवा नविन फंडा सुरु आहे.

 

जुगाराने अनेकांचे संसार उध्वस्त नांदाफाटा परिसरात छोट्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत जुगार लावण्याचे वेड लागले आहेत अनेकजण चौकाचौकात आकड्याची जमाबेरीज करतांना दिसतात तर काही शौकीन प्ले स्टोअर मधून विशेष अॅप डाऊनलोड करुन आकडा घेऊन अभ्यास करुन सट्टा लावतात परिसरातील अनेकांचे संसार जुगारामुळे उध्वस्त झाले हे जरी खरे असले तरी मोह काही केल्या जात नाही . वेड असे की आज नाही तर उद्या लागेल पण गेम नक्की लागेलच आपले भाग्य उजळेल हीच आशा अनेकांचे घरे आजही उध्वस्त करीत आहे सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मूग गिळून चुप बसले असल्याने येथील सट्टापट्टी व्यवसाया विरोधात पुढे येऊन तक्रार करायला तयार नसल्याने सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here